इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल डिप्लोमा साठी उत्कृष्ट पर्याय

By : Polticalface Team ,16-05-2025

इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल डिप्लोमा साठी उत्कृष्ट पर्याय    लिंपणगाव (प्रतिनिधी) -  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना संचलित श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे, इंदिरा गांधी पॉलिटेक्निक 1982 मध्ये स्थापन झाले आहे. ए.आय.सी.टी.ई च्या मानांकनानुसार भव्य इमारत बांधलेली आहे.या संस्थेचे कामकाज अध्यक्ष आदरणीय श्री.राजेंद्र दादा नागवडे, व्हाईस चेअरमन श्री. बाबासाहेब भोस व सर्व सन्माननीय संचालक मंडळ तसेच निरीक्षक सचिनराव लगड सर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या पॉलीटेक्निक मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग या शाखेमध्ये तीन वर्षाचे डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच एका वर्षासाठी सायबर सिक्युरिटी व सीएनसी मशीन टेक्निक  हे कोर्सेस उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई मार्फत होणाऱ्या वार्षिक मूल्यांकनामध्ये पॉलिटेक्निकला अतिउतृष्ठ श्रेणी प्राप्त झालेले श्रीगोंदा परिसरातील एकमेव पॉलिटेक्निक आहे. सर्व शाखांसाठी सुसज्ज अद्यावत व आधुनिक उपकरणाचा समावेश असलेल्या प्रयोगशाळा वर्कशॉप उपलब्ध आहेत., सर्व संगणक लॅब, लँग्वेज लॅब, कॉम्प्युटर सेंटर हे इंटरनेट सुविधा, डिजिटल प्रोजेक्टर आणि अद्यावत सॉफ्टवेअर सुसज्ज आहेत. वर्ग खोल्यांमध्ये इंटर ऍक्टिव्ह पॅनल बोर्ड असलेले श्रीगोंदा तालुक्यातील पॉलिटेक्निक आहे तसेच येथे स्मार्ट शिक्षणासाठी डिजिटल क्लासरूम उपलब्ध आहेत. सुरक्षेतेसाठी पॉलिटेक्निक मध्ये सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या पॉलीटेक्निक मध्ये प्राध्यापक वर्ग उच्चशिक्षित आणि अनुभवी आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर दिला जातो.महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी 2024 च्या परीक्षेमध्ये 94.11% गुण मिळालेले विद्यार्थी आहेत तसेच 90% पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी आहेत, अशा प्रकारे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखलेली आहे पॉलिटेक्निकचा प्लेसमेंट सेल सक्रिय असून बजाज ऑटो लिमिटेड, टाटा मोटर्स,एपिटोम लिमिटेड,महालक्ष्मी लिमिटेड यासारख्या नामांकित मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंट ची संधी मिळाली आहे. दहावी नंतर प्रथम वर्षचा डिप्लोमा व बारावी सायन्स/ आय.टी.आय नंतर थेट द्वितीय  वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा या पॉलिटेक्निकला आहे, तरी डिप्लोमा प्रवेशासाठी आजच आपल्या इंदिरा गांधी पॉलिटेक्निक, बेलवंडी येथे संपर्क साधावा, असे आव्हान प्राचार्य प्रशांत दत्तात्रय भोईटे यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट

मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन

आठवण शाळेची....उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र. 2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .

पद्म पंडित प्रतिष्ठानच्या वतीने कंदर येथे गुणवंतांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना बॅग तसेच पाण्याची बॉटल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

आज योग दिनाचे महत्त्व व गरज

राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड

पारधी समाज रस्त्यावर, शासनाच्या योजनांपासून वंचित पक्क्या घरासाठी प्रशासनाकडे वंचितचे निवेदन