दौंड महसूल प्रशासनाने तालुका लोकशाही दिनाचे केले आयोजन. नागरीकांच्या अडी अडचणी तत्काळ सोडवण्याचे आश्वासन तहसीलदार अरुण शेलार.
By : Polticalface Team ,18-05-2025
दौड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १७ मे २०२५ दौंड तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने तालुका लोकशाही दिन सोमवार, दिनांक १९ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय राहू येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली
या लोकशाही दिनामध्ये नागरिकांना शासनाच्या विविध विभागांशी संबंधित समस्या व तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. स्थानिक प्रशासन महसूल पंचायत राज पोलिस प्रशासन कृषी आरोग्य महिला व बालकल्याण सामाजिक न्याय सार्वजनिक बांधकाम इत्यादी विभागांचे सर्व शासकीय अधिकारी उपस्थित राहणार असून संबंधित तक्रारींचे निराकरण करुन तत्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासन अरुण शेलार यांनी दिले असून या बाबत परीसरातील नागरिकांनी ३ प्रतीमध्ये आपला तक्रारी अर्ज सोबत घेवून यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दौंड तालुक्यातील मौजे राहु ता दौंड जिल्हा पुणे येथील पंचक्रोशीतील सर्व नागरिक, ग्रामस्थ, लोक प्रतिनिधी, सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते आणि संस्थांनी या लोकशाही दिनामध्ये उपस्थित राहून आपल्या विभाग परीसरातील विविध अडी अडचणी व प्रश्नांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :