बारामती बस्थानाकामधील गाळ्यांच्या निलावास वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध
By : Polticalface Team ,20-05-2025
बारामती जन आधार भिमसेन जाधव मो 9112131616 शहरांमधील गट क्र. 6/3/अ,ब, 6/4/अ, 6/4/अ/1, ही जागा इनाम वर्ग 6 ब (महार वतन) जागा आहे या जागेवर एसटी महामंडळाने बेकायदेशीर ताबा घेऊन बस स्थानक बांधले आहे. या जागेचे मूळ मालक अनुसूचित जातीतील महार जातीचे आहेत. ही जागा ताब्यात घेत असताना संबंधित मालकांना कोणतेही प्रकारची नोटीस अथवा पूर्व सूचना दिलेली नाही. या जागेची 7/12 उतारे आजही संबंधित मूळ मालकांच्या नावावरती आहेत संबंधित मालकांनी याबाबत अनेक निवेदने मोर्चे आंदोलने केलेली आहेत. यावर मा. उपविभागीय अधिकारी यांनी चौकशी करत असताना दिनांक 18/10/1968 व दिनांक 24/06/ 1970 च्या मा. उपविभागीय अधिकारी यांच्या ऑर्डर दाखवत आहेत एका ऑर्डर नुसार वतनी जागेवरती अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केले म्हणून त्यांना या जागेमधून बेकायदेशीर ताबेधारक म्हणून काढून टाकले व दुसऱ्या ऑर्डर नुसार वतनी जागेवर अतिक्रमण धारक असल्याने शर्तीचा भंग झाला म्हणून सदरील जागा ताब्यात घेतल्या आहेत अशा दोन्ही ऑर्डर तात्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी केलेले आहे ही ऑर्डर इंग्लिश मध्ये केलेली आहे. मुळात अशा प्रकारच्या ऑर्डर करायचे अधिकार महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम 1959 या अधिनियमातील तरतुदीनुसार मा. उपविभागीय अधिकारी यांना नाहीत या अधिनियमानुसार सर्व अधिकार मा. जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या वरील अधिकारी यांना आहेत असे असताना त्यावेळी असणारे मा. उपविभागीय अधिकारी यांनी वरील प्रकारच्या बेकायदेशीर ऑर्डर करून शासन नियमांचा भंग केला आहे व संबंधित मूळ मालकांवर अन्याय केला आहे.
या बेकायदेशीर ऑर्डरचा इफेक्ट या जागेच्या सातबारावर झालेला नाही त्यामुळे ही जागा आजही मूळ मालकांच्या नावावरती आहे.
तरी देखील या जागेची संपादन झालेले नसताना ही जागा मूळ मालकांच्या नावे असताना तसेच या जागेवरती बांधकाम करण्याबाबत कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीरपणे या जागेवरती बारामती बस स्थानक बांधण्यात आलेला आहे व या जागेमध्ये बांधकाम करून गाळे काढण्यात आलेले आहेत या गाळ्यांचे निलाव करण्यासाठी अथवा हे गाळे भाड्याने देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभाग पुणे यांच्यामार्फत बारामती बस स्थानकामधील रिक्त वाणिज्य आस्थापना, चालवण्यास देण्यासाठी ई-निविदा सूचना क्र. 04/2025-26, दि.13/05/2025 रोजी प्रसारित केली आहे.
या जागेचे कोणत्याही प्रकारची संपादन झालेली नसताना, बेकायदेशीरपणे या जागेवरती बांधकाम करून गाळ्यांचे निलाव करण्यासाठी काढलेली निविदा रद्द करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी जे कोणी बारामती बस स्थानक मध्ये गाळे घेणार आहेत त्यांना आवाहन केले की, बारामती बसस्थानकांमधील गट क्र. 6/3/अ, ब, 6/4/अ, 1 ही जागा महार वतनी जागा आहे व आज ही मूळ मालकांच्या नावे आहे. या जागेचे बसस्थानकासाठी कोणतेही प्रकारे संपादन झालेले नाही या जागेवरती बांधकामाची कोणतीही परवानगी नाही हे प्रकरण जिल्हाधिकारी पुणे यांच्यासमोर चौकशीसाठी दाखला आहे. एस टी महामंडळ ने हे प्रकरण निकाली निघत नाही तोपर्यंत याच्या निविदा काढू नये त्या रद्द कराव्यात तसेच या ठिकाणी गाळे घेणाऱ्यांनी या जागेचे सातबारे उतारे एस टी महामंडळाच्या नावे आहेत का? या जागेचे संपादन झाले आहे का? वर नमूद गटांमध्ये बांधकामाची परवानगी घेतली आहे का? याची तपासणी करावी कारण उद्या जाऊन कोर्टाच्या माध्यमातून सदरील बेकायदेशीर बांधकाम पाडण्याबाबतच्या आदेश होऊ शकतात तसेच सदरील जागा मूळ मालकांना परत देण्याचे आदेश होऊ शकतात त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी व बारामती बस स्थानकामध्ये गाळे घेऊ नये. असे आव्हान केले. यावेळी मोहन शिंदे, लक्ष्मण सोनवणे, कृष्णा साळुंके, चैतन्य साबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.
जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.
श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके
लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट
मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन
आठवण शाळेची....उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र. 2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .
पद्म पंडित प्रतिष्ठानच्या वतीने कंदर येथे गुणवंतांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना बॅग तसेच पाण्याची बॉटल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
आज योग दिनाचे महत्त्व व गरज
राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड
पारधी समाज रस्त्यावर, शासनाच्या योजनांपासून वंचित पक्क्या घरासाठी प्रशासनाकडे वंचितचे निवेदन