श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

By : Polticalface Team ,11-11-2025

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार श्रीगोंदा प्रतिनिधी श्रीगोंदा नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे मत महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी २२ उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदासाठी एक सक्षम उमेदवार देऊन त्यांना निवडून आणण्याचा चंग यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने बांधण्यात आला. या पत्रकार परिषदेसाठी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके, श्रीरामपूर चे आमदार आणि तालुक्याचे सुपुत्र आ.हेमंत ओगले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, शिवसेना ठाकरे गट उपनेते साजन पाचपुते, युवा नेते गणेश भोस, हरिदास शिर्के, विजय शेंडे, प्रशांत ओगले, संतोष इथापे, आदी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. निलेश लंके म्हणाले की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी चांगला उमेदवार देणारा असून, सर्वसामान्य जनता आघाडीलाच स्वीकारणार आहे. राजकारणात आर्थिक ताकद महत्त्वाची नाही. असे मत त्यांनी व्यक्त केले. तर आ.हेमंत ओगले यावेळी म्हणाले की, महाविकास आघाडी श्रीगोंदा ची निवडणूक एकसंघ होऊन लढणार आहे. सगळेच सत्ताधारी पक्षाकडे पळत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला नवीन चेहरे मिळणार आहेत. एक मुखी एकच उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी देऊन निवडून आणणार आहोत. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खरी लोकशाही टिकवण्याचे काम केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर महायुती सरकार बद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. राज्यातील शेतकरी पूर्ण डबघाईला आला आहे.महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीर उभी आहे त्यामुळे जनता महाविकास आघाडीला स्वीकारणार असल्याचे मत जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनी व्यक्त केले. तर ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी सांगितले की ,श्रीगोंदा शहरात महाविकास आघाडी एकत्र असून या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचा पॅनल तयार होणार असून, नगराध्यक्ष पदासह सर्व जागा लढवून नगर परिषद मधे सर्व सामान्य मतदाराच्या माध्यमातून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करून ,शहरातील रस्ते, पाणी ,आरोग्य ,स्वच्छता, विज यासारख्या अनेक प्रलंबित प्रश्न सोडवणार आहोत. असे मत भोस यांनी यावेळी व्यक्त केले.या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने जागा वाटप तसेच पॅनल तयार करण्याची जबाबदारी बाबासाहेब भोस,साजन पाचपुते, प्रशांत ओगले या नेत्याकडे सोपवण्यात आली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट