देलवडीचा खंडोबा भुलेश्वर महादेवाच्या भेटीला. परतीचा विसावा रावबा ची वाडी येथे जोरदार स्वागत. श्रीपतीराव दोरगे यांनी. जपली सत्तर वर्षाची परंपरा.
By : Polticalface Team ,12-08-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १२ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील मौजे देलवडी ता दौंड जिल्हा पुणे येथील कुलदैवत श्री खंडोबाची पालखी सोहळा. पारंपरिक ढोल ताशा संबळ हलगी वाद्यांच्या गजरात देलवडी वांजरेवाडी पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह. पालखी सोहळा भुलेश्वर महादेवाच्या भेटीसाठी पालखी सोहळ्याचे दि १२ ऑगस्ट रोजी आगमन झाले होते.
श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी दौंड - पुरंदर सीमेवर असलेले श्री भुलेश्वर देवस्थान या ठिकाणी देलवडी चा खंडोबा स्नान करण्यासाठी देलवडीच्या खंडोबा मंदिरातून पालखी सोहळा. १० ते १२ कि लो मिटर अंतरा वरून पायी चालत भुलेश्वर या ठिकाणी येत असतात. ही धार्मिक परंपरा गेली सत्तर वर्षापासून देलवडी वांजरेवाडी येथील ग्रामस्थांनी कायम राखली आहे. तसेच यवत येथील रावबाची वाडी येथील श्रीपतीराव दोरगे यांच्या निवासस्थानी खंडोबा देवाची पालखी श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी दुपारच्या वेळी विसावा घेतला जातो. अशी प्राथमिक माहिती खंडोबा देवस्थानचे पुजारी बबनराव शिर्के महाराज यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की देलवडीच्या खंडोबाची पालखी सोहळा भुलेश्वर (मंगळ गड) येथे खंडोबा देवाची आंघोळीचा धार्मिक कार्यक्रम करून. मंदिरातील महादेव शिवलिंगाचे दर्शन घेऊन. सर्व भाविक फक्त भुलेश्वर मंगळ गडा वरून पाय उतार होऊन गडाच्या पायथ्याशी यवत हद्दीतील रावबाची वाडी येथील श्रीपतीराव दोरगे यांच्या निवासस्थानी दुपारच्या वेळेत देलवडी खंडोबाच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाले.
या प्रसंगी पालखी सोहळ्याचे यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष शंकराव दोरगे पाटील. कैलास आबा दोरगे. यवत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य नाथा आबा दोरगे पाटील. मुरलीधर दोरगे. दत्तात्रय दोरगे. अरविंद दोरगे. कोंडीबा दोरगे. या ग्रामस्थांनी प्रवेशद्वारात पालखी सोहळ्याचे पुष्प फुलांची उधळण करत. जोरदार स्वागत करुन खंडोबा देवाची पालखीला विसावा देण्यात आला. श्रीपतीराव दोरगे यांनी सत्तर वर्षाची ही परंपरा कायम जपली आहे.
या वेळी यवत येथील समस्त ग्रामस्थ यांच्या हस्ते खंडोबाची आरती करण्यात आली. पालखी सोहळ्यातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी श्रीपतराव दोरगे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तसेच शिवसेना पक्षाचे प्रचारक व समर्थक मोहनराव पवार यांना श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी खंडुभाऊ दोरगे. माणिकराव दोरगे. दिपक दोरगे. काळुराम शेंडगे बालाजी घोडके यवत येथील रावबाची वाडी पंचक्रोशीतील महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच देलवडी येथील खंडोबा देवाचे मानकरी व पुजारी बबनराव शिर्के महाराज. यांनी हि परंपरा कायम स्वरूपी जपली असल्याने यवत येथील श्रीपतीराव दोरगे तसेच समस्त ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी दादा वाघोले महाराज. सुयोज वांजरे. विनायक भागवत. देलवडी व वांजरे वाडी येथील आदी समस्त ग्रामस्थ युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :