By : Polticalface Team ,13-08-2024
करमाळा प्रतिनिधी : करमाळा येथे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे शिवस्वराज्य यात्रा होणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्य़ातील दौरा करत बार्शी येथे शेतकरी मेळावासाठी जात आसताना माढा तालुका कुर्डवाडी येथे माढा मनसे तालुकाध्यक्ष पदाधिकाऱ्यांसह व शिवस्वराज्य यात्रा मोहळ येथे सकल मराठा समाज व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष यांनी मराठा आरक्षण विषयी आपली भुमिका स्पष्ट करावी असा प्रश्न केला होता पण त्यांनी अजुन पर्यंत आपली मराठा आरक्षण विषयी भुमिका कुठेही स्पष्ट केली नाही तरी महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुक्याच्या च्या वतीने मागणी करत आहोत करमाळ्यातील शिवस्वराज्य मेळाव्यात मराठा आरक्षण विषयी भुमिका स्पष्ट करावी असे आवाहन मनसे तालुकाध्यक्ष करमाळा मा. संजय (बापु) घोलप यांनी केले जेणे करून महाराष्ट्र राज्यातील नागरीक संभ्रमात राहणार नाहीत..