राज्यातील महाविकास आघाडीने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडू नये. भाजपचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे

By : Polticalface Team ,2024-12-12

राज्यातील महाविकास आघाडीने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडू नये. भाजपचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.

दौंड ता १२ डिसेंबर २०२४  राज्यातील महाविकास आघाडीने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडू नये. आघाडीला अपयश पचवता येईना म्हणून ते चुकांवर पांघरूण घालत आहेत. भाजपच्या यशामुळे आघाडीची नेते मंडळी सैरभैर झाली आहेत. कार्यकर्ते सत्तेच्या विरोधात फार काळ संघर्ष करू शकत नसल्याने ते भाजपशी जवळीक साधू लागले आहे. त्यांच्या मनात चिलबिचल चालू आहे. ईव्हीएमची विश्वासार्हता माहित असूनही केवळ कार्य़कर्ते टिकवून ठेवण्यासाठी राज्यातील आघाडीची जानकार नेते मंडळी सुद्धा ईव्हीएमवर अपयशाचे खापर फोडत आहेत. हेच आश्चर्य वाटत आहे. अशी खरमरीत टिका दौंड तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात केली आहे. 

ठोंबरे प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हणतात की राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी १९९९, २००४, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या. त्यात त्यांना बहुमत मिळाले. तेव्हा मतदान यंत्र चांगले होते.  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात महायुतीचे एकमेव राहुल कुल वगळता सर्व आमदार हे काँग्रेस व राष्ट्रवादीचे विजयी झाले होते. तेव्हा ईव्हीएम चांगले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मविआला अनपेक्षित विजय मिळाला आहे. तेव्हा ईव्हीएम चांगले होते. वायनाडमध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी चार लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून निवडून आल्या तेव्हा ईव्हीएम चांगले होते. पंजाब व जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला. तेव्हा ईव्हीएम चांगली. सुप्रियाताई सुळे खासदार झाल्या तेव्हा ईव्हीएम चांगले. अरे काय चालले आहे. मतदारांना तुम्ही मुर्ख समजता का.  शहाण्या मतदारांनी तुमचा करेक्ट कार्य़क्रम केलेला आहे.  


या सर्व वागण्यावरून महाविकास आघाडीची कीव करावी वाटते. ज्या नेत्यांनी एके काळी देशाचे, राज्याचे नेतृत्व केले अशा जाणकार नेत्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घ्यावा ही खेदाची बाब आहे. ईव्हीएम कथित घोटाळ्यावरून  सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फटकारले असले तरी जीव जाईना म्हणून हातपाय खोडायची वेळ महाविकास आघाडीवर आली आहे. 


मुख्यमंत्री लाडकी बहीण, कृषी पंपाचे वीज बिल माफ, शेतकरी सन्मान योजना, शेती कर्ज माफी, घरकुल योजना, आरोग्य सुविधा अशा वैयक्तिक योजनांबरोबर दिर्घकालीन विकासाच्या योजनांमुळे महायुतीला राज्यात मोठे यश मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पोटात गोळा उठला आहे. पक्षांचे व नेत्यांचे आस्तीत्व टिकवण्यासाठी मविआची ही कोल्हेकुई चालू आहे. मतदार राजा हा सुज्ञ असून महाविकास आघाडीने ही कोल्हेकुई चालूच ठेवली तर त्यांचे उरलेसुरले मतदार देखील कमी होतील. 


दौंडचा विचार केला तर आमदार राहुल कुल यांनी तालुक्याचे पुढील ५० वर्षांचे व्हिजन मतदारांपुढे मांडले आहे. खडकवासला ते फुरसुंगी बोगद्यातून पाणी येणार ( २२०० कोटी ), हडपसर ते बोरीभडकपर्यतचा सहापदरी उड्डाणपूल ( सहा हजार कोटी रूपये ), मुळशीचे धरणातील पाणी आणणार, प्रांत कार्यालय, सत्र न्यायालय सुरू केले. क्रीडा संकुल, नवीन वीज उपकेंद्र ( १७५ कोटी ), रेल्वेवरील खामगाव,सहजपूर येथील उड्डाणपूल, बेबी कालवा अस्तरीकरण ( ३०० कोटी रू. ) अशी कितीतरी कामे सांगता येतील. या विकासकामांना मतदारांनी पसंती दिली आहे. फरक स्पष्ट आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने रडगाणं बंद करावे.



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

सोलापूर स्मार्ट सिटीचे प्रमुख अधिकारी गोपिचंद कदम यांचा तुळजा भवानी भोपे पुजारी समितीच्या वतीने केला सन्मान.

रमाई आवास घरकुल योजनेसाठी शासनाचे अनुदान १ लाख २० हजारात होत नाही घरकुल ? २ लाख ५० हजार अनुदानाची मागणी.

चार अपत्य असल्याने गुंडेगाव ग्रामपंचायत सदस्य अपात्र , जिल्हाधिकारी यांचा आदेश

मूक नायक या वृत्तपत्रांचा स्थापन दिन.आणि संघ नायक न्यूज‌. वर्धापन दिनानिमित्त सासवड येथे १३ जानेवारीला भव्य गौरव पुरस्कार सोहळा.

व्यंकनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी शिवांजली कापसे हिचा तालुकास्तरीय.विज्ञान प्रदर्शन व वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

जगण्याची व्यथा म्हणजे कथा - प्रसिद्ध कथाकार सुरेंद्र गुजराथी

रतन टाटांचे विचार पेरले तर भारतात आदर्श उद्योजकांची बाग फुलेल डॉ. भावेश भाटीया यांचा विश्वास.

लेखक हा संघर्ष व संवेदनशीलतेतून निर्माण होतो,मात्र लिहिण्याची प्रेरणा वाचनातूनच मिळते.- डॉ. बाळासाहेब बळे

ध्येयवादी पत्रकारिता सध्या राहिली नसून सत्ताधारी लोकांच्या हातातलं बाहुले बनली आहे. डिजिटल मिडीयाच्या दबावामुळे तरी पत्रकारिता तगून राहील जेष्ठ पत्रकार दशरथ यादव

आवाटी येथील ज्येष्ठ नागरिक आदम शेख यांचे निधन

के. पी. जाधव कॉलेजमध्ये १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन व साई भूषण पुरस्कार उत्साहात संपन्न

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सह‌ सा. का. ची पहिली उचल २८०० रुपये.

स्वभिमानी मराठा महासंघाच्या पहिल्या अधिवेशनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात, राज्य निरीक्षक भानुदास वाबळे स्वभिमानी मराठा महासंघ भारत

विद्यार्थ्यांनी आनंदी बाजारातून व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे --निरीक्षक सचिनराव लगड

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर कार्यशाळा संपन्न.

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मलठण येथे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

दौड शहरातील फन ट्र टाग्रेट नावाचा जुगार अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आनंदी बाजारातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचा फायदा

श्रीगोंद्यात राष्ट्रीय ग्राहक दिनास अनेक अधिकाऱ्यांची दांडी ! , अनुपस्थित अन्य खात्यातील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार- अप्पर तहसीलदार श्री मुदगुल