यवत मलभारे वस्ती येथील श्री गणेश मूर्तीची प्रणतिष्ठापना व कलशारोहन सोहळा. आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत होणार.
By : Polticalface Team ,22-12-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २२ डिसेंबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील मलभारे वस्ती आयोजित श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा शनिवार दि २१ डिसेंबर २०२४ ते सोमवार दि २३ डिसेंबर २०२४ पर्यंत या कार्यक्रमाला प्रारंभ झाला असल्याची माहिती यवत मलभारे वस्ती येथील आयोजकांनी दिली असुन
या कार्यक्रमाला दौंड विधानसभेचे लोकप्रिय आमदार अँड राहुल कुल व. सौ कांचन राहुल कुल. पुणे जिल्हा महिला अध्यक्षा भारतीय जनता पार्टी यांची प्रमुख उपस्थितीमध्ये राहणार असुन आज शनिवार रोजी कार्यक्रमाच्या सुरवातीला माजी आमदार रंजनाताई कुल यांनी भेट दिली असल्याचे सांगितले
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवार दि २१ रोजी श्री गणेश मूर्तीची यवत गावातुन भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली
पिठस्थापना करण्यात आली असून सायंकाळी ६ ते ८ वाजे दरम्यान हभप शिवलिलाताई महाराज पाटील यांचे वारकरी सांप्रदायिक किर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील भाविक भक्त महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
यवत मलभारे वस्ती आयोजित श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने यवत पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविली होती या पुढेही सोमवार दि २३ पर्यंत धार्मिक व पारंपरिक पद्धतीने सर्व कार्यक्रम होणार असल्याने परीसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी विनंती केली आहे
आज रविवार दि.२२ रोजी सकाळी ८:३० ते दु १२ वाजे पर्यंत होम हावन व मूर्तीन्यास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी ६ ते ८ या वेळात भगवंताचार्य हभप महेश महाराज शास्त्री संत तुकाराम महाराज संस्थान केंदळ. यांच्या कीर्तनाचा यवत पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी आव्हान केले असून सोमवार दि २३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८:३० ते दु २ वाजे दरम्यान श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहन श्री महंत हेमंतपुरी महाराज श्री तीर्थ शेत्र रामदरा शिवालय लोणी काळभोर यांच्या हस्ते महापुजा आयोजित करण्यात आली असून सायंकाळी ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे प्रेरणास्थान हभप चैतन्य महाराज वाडेकर जगद्गुरु संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी भामचंद्र डोंगर पुणे यांचे किर्तन होणार आहे.
वाचक क्रमांक :