भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

By : Polticalface Team ,20-12-2024

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २० डिसेंबर २०२४ नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम टप्प्यात असताना नागरीकांच्या मानवी अवयवदानाची क्लिष्ट प्रक्रिया सोपी करण्यासाठी कार्यवाही करावी व अवयवदान बाबत जनजागृती करावी अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली आहे. या वेळी पुढे बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले कि, वेगवेगळ्या व्याधींमुळे अवयव निकामी होण्याचे प्रमाण आणि त्यांचे प्रत्यारोपण करण्याची निकड वाढत आहे. भारत सरकारने दि. ८ जुलै १९९४ पासून आपल्या देशामध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा लागू केला आहे, राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक ०४.०८.२०१५ रोजी झालेल्या बैठकीत मानवी अवयव प्रतीरोपण (सुधारणा) अधिनियम - २०११ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जगामध्ये स्पेन हा देश अवयव दानात अग्रेसर असून इंग्लंड, अमेरिका, हाँगकाँग, जपान इत्यादी देशात ही चळवळ मोठ्या प्रमाणवर राबविली जात आहे. राज्यातील सुमारे पाच लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू अवयव निकामी झाल्यामुळे होत असल्याची बाब सर्वेक्षणात निदर्शनास आली आहे. भविष्यात मृत्यूनंतर मृत मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आहे. मृत शरीराचे सुस्थितीत असणारे अवयव काढून घेऊन गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी सुसज्ज यंत्रणा निर्माण करण्याची तसेच त्यासाठी आवश्यक जनजागृती व प्रशासकीय यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यकता आहे. ज्या कुटुंबातील व्यक्तीने अवयवदान केले आहे त्या व्यक्तीचा आदर सन्मान म्हणून त्यांच्या कुटुंबियांचा शासनाने सन्मान करण्याची देखील आवश्यकता आहे, मोठमोठ्या संस्था, देवस्थाने यांच्याकडे जमा होणाऱ्या निधीतून अवयवदान तसेच प्रतीरोपण यासाठी मदत मिळण्यासाठी देखील या संस्था देवस्थानावर बंधने घालण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समित्यांची स्थापना करण्यात आली असून, या समित्यांतर्फे अवयवदाता (डोनर) व अवयव भोक्ता (रिसीपियंट) यांची व त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करून मगच या शस्त्रक्रियेला परवानगी देण्यात येत आहे. रुग्णांना अवयव मिळवण्यासाठी मध्यवर्ती अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीकडे (झेडटीसीसी) नोंदणी करावी लागते. ही वेळखाऊ प्रक्रिया टाळण्यासाठी नव्या तंत्रज्ञानांची मदत घेत समितीने अॅप आणि पोर्टल तयार केले आहे. यामुळे अवयवदानाची प्रक्रिया सुलभ होणार असून, प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता असून याबाबत शासनाने कार्यवाही करावी आशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.