कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,27-06-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता.२७ जून २०२५ दौंड तालुक्यातील मौजे गिरीम ता दौंड जिल्हा पुणे गावचे हद्दीत फॉरेस्टचे डोंगरावर दुपारी 03 वाजे सुमारास शोध घेत असताना फिर्यादीचा भाऊ मोहन धुळा तालवर वय 45 वर्षे रा.बिरोबा नगर गिरीम ता.दौंड जि.पुणे यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कु-हाडीने त्याचे डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन त्याचा खुन केला असल्याची धक्कादायक घटना दिनांक 25/06/2025 रोजी दुपारी 03.वाजे पुर्वी मौजे बिरोबा नगर गिरीम ता.दौंड जि.पुणे या ठिकाणी घडली आहे
दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी-सावळाराम धुळा तालवर वय 32 वर्षे व्यवसाय मेंढपाळ रा.बिरोबा नगर गिरीम ता.दौंड जि.पुणे.यांच्या तक्रारी वरून गु.रजि नं 445/2025 भा.न्या.संहिता 103 अंन्वये अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या बाबत अधिक माहिती अशी की दिनांक 25/06/2025 रोजी सकाळी 08 वाजे सुमारास फिर्यादी हे गिरीम गावचे हद्दीत शेतामध्ये उसाचे पाचट पेटविण्यासाठी गेला होता दुपारी 1:30 वाजे सुमारास भाऊ नातु धुळा तालवर याने गुलाब तालवर याचे मोबाईल वरून फोन करुन फिर्यादीस कळविले की भाऊ मोहन हा मेंढयाचे मागे दिसत नाही तो कुठेतरी झोपला आहे की काय कळत नाही आपल्या मेंढया 2 ते 3 किलो मिटर लांब दुसरीकडे गेल्या आहेत असे सांगितले वरून फिर्यादी त्यांचे मोटार सायकलवर बेटवाडी येथील तंबु जवळील कॅनॉलने मोटार सायकलवर फिरत भाऊ मोहन याचा शोध घेत होता परंतु मोहन मिळुन आला नसल्याने फिर्यादी पुन्हा (पाल) तंबु जवळ येवुन (वहिनी) कमल मोहन तालवर यांना म्हणाला मोहन हा मेंढयाचे माघे नाही तो कुठेतरी गेला आहे आपण त्याचा शोध घेवु असे बोलुन पुतण्या अजित व कमल दोघेही त्याचा शोध घेण्यासाठी मौजे गिरीम गावचे हद्दीतील फॉरेस्टचे डोंगरावर दुपारी 03 वाजे सुमारास शोध घेत असताना मोहन हा डोंगरावर जखमी अवस्थेत पालथा पडलेला दिसुन आला
त्याचे डोक्याला गळ्याला दुखापत झालेली होती तो बेशुध्द अवस्थेत होता. त्याचे जवळ एक लोखंडी पाते असलेली कु-हाड व दोन लाकडी काठ्या त्यावर रक्त लागलेल्या दिसल्या असल्याने
पुतण्या अजित याने फोन वरुन बाजीराव तालवर यास सांगितले की मोहन यास कोणीतर मारहाण केली आहे
तो गंभीर जखमी आहे त्यास औषध उपचार करण्यासाठी घेवुन जायचे आहे असे सांगितले वरून तेथे नामदेव झिटे हे चार चाकी गाडी घेवुन आले त्यावेळी आम्ही मोहन यास चार चाकी गाडीमध्ये घेऊन दौंड येथील महालक्ष्मी हॉस्पीटल येथे गेलो परंतु त्याची काही हालचाल होत नसल्याने आम्ही त्यास यवत येथील सरकारी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी घेवुन गेलो असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन पाहिले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले असून
दिनांक 25/06/2025 रोजी दुपारी 03 वाजे पुर्वी मोहन धुळा तालवर वय 45 वर्षे रा. बिरोबा नगर गिरीम ता.दौंड जि.पुणे यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कु-हाडीने त्याचे डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन त्याचा खुन केला
असल्याने दौंड पोलीस स्टेशन येथे गु.रजि नं 445/2025 भा.न्या.संहिता 103 अंन्वये अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी माहिती दिली असुन दाखल अधिकारी -पो.स.ई कदम
पो.स.ई बिद्री पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.
जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.
श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके
लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट