जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

By : Polticalface Team ,21-06-2025

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २१ जून २०२५ जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर आषाढी पायी वारी पुणे सोलापूर महामार्गाने मार्गस्थ होत आहे दौंड तालुक्यातील मौजे यवत तालुका दौंड जिल्हा पुणे येथील श्री काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी सोमवार दि २३ जून २०२५ रोजी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सालाबाद प्रमाणे यवत मुक्कामी येत असल्याने पालखी आगमनाच्या पूर्वतयारी यवत ग्रामस्थांनी जोरदार सुरू केली असल्याचे दिसून येत आहे या बाबत यवत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांच्याशी संवाद साधला असता यवत गाव पालखी स्वागतासाठी सज्ज झाले असल्याचे त्यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने गावातील सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान करुन पूर्ण केली असून पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी सर्व प्रकारे सुविधा उपलब्ध करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने बाजार मैदान व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी तीन भव्य शेड उभारण्यात आलेली आहेत. एक शेडमध्ये किमान पंधरा ते वीस हजार पालखी सोहळ्यातील वारकरी विश्रांती घेऊ शकतात श्री काळभैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे बाजार मैदानात वारकरी भाविकांसाठी स्नान करण्यासाठी पाणी शौचालय वीज व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच प्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यवत या ठिकाणी एक भव्य मोठे शेड उभारण्यात आले असून वारकऱ्यांसाठी पाणी स्नान शौचालयाची ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे यवत गावठाण हद्दीतील सर्व रस्ते मुरुमीकरण करून दुरुस्ती करण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून पाणी बीज निवारा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था यवत ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली असल्याचे ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी सांगितले जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर आषाढी वारी पुणे सोलापूर महामार्गाने मार्गस्थ होत असल्याने दौंड तालुक्यातील सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी कर्मचारी पालखी आगमनाच्या पूर्व तयारीसाठी जोमाने कामाला लागली असल्याचे दिसून येत आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर आषाढी पायी वारी दरम्यान पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला दिसून येत आहे यवत गावातील हर्षवर्धन मंगल कार्यालय समृद्धी मंगल कार्यालय या ठिकाणी सर्व पोलीस प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी व पोलीस कर्मचारी यांची सर्व व्यवस्था यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती दिली. पुणे सोलापूर महामार्ग हायवे रोड प्रशासनाने यवत गावातील महामार्ग लगत असलेल्या ड्रेनेज लाईन ची दुरुस्ती. भुयारी मार्गात विद्युत रोषणाई. महामार्गाच्या मध्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलेला आहे यवत गावातील मुख्य प्रवेशद्वारामध्ये सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता तयार करून यवत ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा दिला आहे सर्विस रोड दोन्ही बाजूच्या ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण होऊ शकले नसल्याचे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण आरोग्य विभागाच्या वतीने आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन पिण्याचे पाणी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व आरोग्य संदर्भात स्वतः नागरिकांनी संसर्गजन्य आजारापूर्वी घ्यावयाचे दक्षता या बाबत अधिक माहिती दिली असल्याचे यवत भागातील अशा स्वयंसेविकांनी सांगितले जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे निमित्ताने यवत गावातील व परिसरातील संपूर्ण वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी यवत महावितरण विभागाचे कर्मचारी गेली आठ दिवसापासून यवत पंचक्रोशीतील विज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत असल्याचे यवत्विस पुरवठा अधिकारी यांनी सांगितले आहे. वारीतील वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोई होणार नाही याची दक्षता घेण्यात आली असल्याची प्रतिक्रिया यवत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

पोलीस उप मुख्यालय बारामती बऱ्हाणपुर येथे मा.श्री संदीपसिंह गिल्ल (भापोसे) पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत एम.आय.डी.सी.परीसरातील उद्योजकांची बैठक संपन्न

पन्हाळा ते पावनखिंड वीर बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा. मराठ्याच्या अतुलनीय पराक्रमाने घोडखिंड झाली पावन.

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा. पाच आरोपी जेरबंद

टाकळी लोणार जि.प.प्रा.शाळेतील आदित्य मोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत निवड

नवरा बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव. आरोपी पती पत्नीवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. आंबेगाव येथील घटना.

तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पती पत्नीला मारहाण करून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. देऊळगाव राजे येथील घटना

शेळ्या चोरणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवली. दोन इसम आंधारामध्ये पळून गेले. एकास दौंड पोलीसांनी पकडले. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

श्रीगोंद्यात मोहरम उत्सव उत्साहात साजरा

अहिल्यानगर जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील शिवपानंद शेख रस्ते प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत , राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

स्वामी चिंचोलीच्या घटनेतील त्या दोन संशयित नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.

शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून दयावी. _जयवंत भाबड

शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश – औरंगाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू

करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन

मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये

आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल