श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

By : Polticalface Team ,21-06-2025

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा    श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.  आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर  तालुक्यातील सर्वच शैक्षणिक संस्थांच्या विद्यालयांमध्ये मोठ्या उत्साही वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. प्रामुख्याने शनिवारी  21 जून रोजी सकाळी आठ ते साडेनऊ वाजेपर्यंत या योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्यनिअर कॉलेजमध्ये ज्येष्ठ योगाचार्य शिवाजीराव पांडव; दत्तात्रेय सस्ते; अर्जुनराव कुलांगे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना योग दिनाचे भरीव असे मार्गदर्शन करत योग दिनाचे प्रात्यक्षिके केली. या योग दिनाची प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. प्रामुख्याने प्रारंभी राष्ट्रगीता नंतर सूक्ष्म व्यायाम यामध्ये मानेचे व्यायाम; हाताचा व्यायाम इत्यादी प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांसमवेत आयोजित करण्यात आली. तर योगासनामध्ये ताडासन; वृक्षासन; पादाहस्त; अर्ध चक्रासन; त्रिकोणअसन; वर्जासन शशांकआसन; वक्रासन; इत्यादी योगातील प्रकार विद्यार्थ्यांसमवेत साजरे केले. विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी मनसोक्तपणे या योग दिनात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे योगासनातील दुसरा प्रकार पोटावरीलअसन यामध्ये सायकलिंग; उताणपादाअसन; अर्धहलासन; पवनमुक्तआसन; श्वासन तर प्राणायामामधील कपाल भारती; भसरीकाअनुलोम मिलन; ब्रह्मश्री इत्यादी योगासनातील महत्त्वाचे प्रकार करण्यात आले.


      तर ज्येष्ठ योगाचार्य अर्जुनराव कुलांगे यांनी मयूर आसन; शिरशासन इत्यादी प्रकार साजरे केले. याप्रसंगी आस्थाअसनाने ज्येष्ठ योगाचार्य दत्तात्रय सस्ते व शिवाजीराव पांडव यांनी योग दिनाची सांगता केली. 


याप्रसंगी योगाचार्य दत्तात्रय सस्ते यांनी या योग दिनाचे महत्त्व सांगताना विद्यार्थ्यांनी सतत व्यायाम करावा; सकस आहार करावा; त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहून बौद्धिक क्षमता वाढली जाते. त्यामुळे दररोज विद्यार्थ्यांनी नियमितपणे योगासने करावीत असे सांगितले. स्वागत विद्यालयाचे प्राचार्य ए. एल. पुराणे यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव इथापे यांनी केले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट

मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन

आठवण शाळेची....उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र. 2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .

पद्म पंडित प्रतिष्ठानच्या वतीने कंदर येथे गुणवंतांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना बॅग तसेच पाण्याची बॉटल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

आज योग दिनाचे महत्त्व व गरज

राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड

पारधी समाज रस्त्यावर, शासनाच्या योजनांपासून वंचित पक्क्या घरासाठी प्रशासनाकडे वंचितचे निवेदन

अज्ञात 5 इसम दोन मोटार सायकलवर आले. मानेवर सुरा ठेवून 3 लाख 52 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले

जावजीबुवाची वाडी ते होले वस्ती मार्ग (रस्ता ग्राम १७७) कॅनल पूलावरून जड वाहतूकीस बंद करण्यात आला आहे.