राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड
By : Polticalface Team ,20-06-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी): राजगुरूनगर येथे हिरवाई पर्यावरण समितीच्या राज्यस्तरीय वार्षिक बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर सर्वानुमते राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी आण्णासाहेब ज्ञानदेव जगताप यांची निवड करण्यात आली. राजगुरूनगर येथे झालेल्या बैठकीत पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी हिरवाई पर्यावरण समिती आणि पर्यावरण समितीचे अध्यक्ष विजयकुमार जेठे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जेष्ठ मार्गदर्शक पांडुरंग चौघुले (सोलापूर) यांच्या उपस्थितीत विविध उपक्रम हाती घेण्याबाबत सर्वानुमते चर्चा करण्यात आली. त्यात आझाद मैदान मुंबई येथे झालेले धरणे आंदोलन, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्टोन क्रेशरमुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने त्यावरून सर्व स्टोन क्रेशरची वास्तविकता तपासणी त्यावर संबंधित प्रशासनाला जाब विचारण्यासाठी, विविध मोर्चे, आंदोलन निश्चित करणे, याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू करणे, तसेच नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करणे व विविध ठिकाणी वृक्षलागवड करणे याविषयी सखोल चर्चा करण्यात आली. त्यानुसार सर्वांनी वरील विषयांना मंजुरी घेऊन सभा पार पडली. या बैठकीस विजयकुमार जेठे, पांडुरंग चौघुले (सोलापूर); संजय गायकवाड नाशिक; (पर्यावरण समिती उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख) शांताराम भोसले (सातारा); माधव सरतापे (छत्रपती संभाजीनगर); आण्णासाहेब जगताप (श्रीगोंदा); संभाजी कापसे (नेवासा); सत्यवान शिंदे (पुणे); इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. आण्णासाहेब जगताप यांच्या निवडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते साजन भैय्या पाचपुते; महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे; नागवडे कारखान्याचे संचालक शरदराव जगताप; जिल्हा शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन अविनाश निंभोरे; माजी चेअरमन बापूराव शिंदे; चेअरमन माधव जगताप सर; बाळासाहेब साळुंके गुरुजी; संजय रायकर सर; रमेश कळमकर; शरद खोमणे; डॉ. उमेश हांडे; डॉ. चंद्रशेखर कळमकर यांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :