By : Polticalface Team ,2025-06-20
करमाळा प्रतिनिधी
दिनांक 19 जून रोजी सकाळी अकरा वाजता मौजे कंदर तालुका करमाळा येथे गुणवंतांचा सत्कार व पाच जिल्हा परिषद शाळेतील मुलांना स्कूल बॅग पाण्याची बॉटल वाटप कार्यक्रम पद्म पंडित प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री अण्णासाहेब पंडितराव पवार यांच्यातर्फे करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान गावचे सरपंच आदरणीय मौला साहेब मुलांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन नानासाहेब लोकरे मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बापूसाहेब कदम ग्रामपंचायत सदस्य ब्रह्मदेव आरकिले साहेब उपसरपंच उदय शिंदे ग्रामपंचायत सदस्य दीपक घोडकोस सोसायटी सदस्य आबासाहेब सुरवसे कृषी अनिल फरतडे साहेब गणेश यादव संजय फरतडे गोकुळ माने कांतीलाल पवार नरसिंह देवकर सतीश पवार शरद पवार जोतीराम सरडे
ग्राम महसूल अधिकारी गोरक्षनाथ ढोकणे साहेब कृषी सहाय्यक राजकुमार महाडिक साहेब जितेंद्र लांडगे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गौतमी लांडगे हजर होते.
यावेळेस पुण्यनगरीचे पत्रकार आदरणीय धनंजय मोरे यांना पावर ऑफ सोलापूर हा पुरस्कार दिल्याबद्दल व समर्थ अनिल फरतडे यांनी सीईटी मध्ये 99.91% मार्क मिळवल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला आणि जिल्हा परिषद शाळा माने वस्ती जिल्हा परिषद शाळा पुनर्वसन जिल्हा परिषद शाळा पाटणे वस्ती जिल्हा परिषद शाळा भांगे वस्ती व जिल्हा परिषद शाळा इंगळे वस्ती या शाळेतील सर्व शंभर विद्यार्थ्यांना बॅग व बॉटलचे वाटप करण्यात आले यावेळेस सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वर्ग तसेच पालक वर्ग बहुसंख्येने हजर होते
सूत्रसंचालन गोरवे गुरुजी व आभार प्रदर्शन साई देवकर यांनी मानले.