अज्ञात 5 इसम दोन मोटार सायकलवर आले. मानेवर सुरा ठेवून 3 लाख 52 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले

By : Polticalface Team ,20-06-2025

अज्ञात 5 इसम दोन मोटार सायकलवर आले. मानेवर सुरा ठेवून 3 लाख 52 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले  दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौड ता 19 जून 2025 दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे बोरीबेल येथील ज्ञानेश्वर चंद्रकांत सावंत 41 वर्ष रा बोरीबेल भापकर वस्ती ता.दौंड जि.पुणे हे त्यांच्या राहत्या घरी असताना अचानक अज्ञात 5 इसम दोन मोटार सायकलवर आले. मानेवर सुरा ठेवून खिशातून जबरीने 7 हजार 500 रुपये एवढी रक्कम काढून घेवून घरातील कपाटातील एकुण 3 लाख 52 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले हि घटना बोरीबेल भापकर वस्ती ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी दि.11/06/2025 रोजी दुपारी 1:30 वाजे सुमारास भर दिवसा घडली असल्याने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील आलेगाव आणि देऊळगाव राजे या ठिकाणी देखील भर दिवसा घरफोडी जबरी चोरीचे प्रकार घडत आहेत दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे दौंड पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी गस्त पेट्रोलिंग करणे आवश्यक असल्याची परिसरात चर्चा आहे दौंड पोलीस स्टेशन येथे दि 19/06/2025 रोजी फिर्यादी ज्ञनेश्वर चंद्रकांत सावंत वय 41 वर्ष व्यवसाय शेती रा.भापकर वस्ती बोरीबेल ता.दौंड जि.पुणे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांन विरुद्ध रजि नं 435/2025 भा.न्या. सं कलम 310 (2). 351(2) अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली असुन या गुन्ह्यातील गंभीरता लक्षात घेऊन तत्काळ तपास यंत्रणा तत्काळ फिरवून तीन आरोपींना दौंड पोलीसांनी ताब्यात घेतले असून अटक करण्यात आले आहे पुढील तपास सुरू करण्यात आला आहे गेला माल:-1) 1 लाख 25 हजार रुपये किंमतीचे एक दोन वाट्याचा सौन्याचा मिनी गंठण. साखळीचा 2.5 तोळे वजनाचा जु.वा.कि.अं. 2) 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोने त्यामध्ये कानातील कर्नफुले पॅन्डल पिळयाच्या अगठया नथ वगैरे वर्णनाचे जु.वा कि.अं 3) 70 हजार रुपये किंमतीचे दोन आर्धा किलो वजनाचे पायातील तोडे. 6 आर्धा किलोचे पैजन देवाची चांदीची 4) 7 हजार 500 रुपये खिशातील रोख रकम त्यामध्ये 100, 200, 500 दराच्या भारतीय चलनातील नोटा भांडी जु.वा.कि.अं असा एकूण 3 लाख 52 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लुटून नेला असल्याचे नमूद करण्यात आले आहे हाकेकत- वर नमूद केले तारीख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी व फिर्यादीची पत्नी मुले असे सर्वजण घरी असताना अचानक अज्ञात 5 इसम दोन मोटार सायकलवर आले आणि फिर्यादीच्या खिशातून जबरीने 7 हजार 500 रुपये एवढी रक्कम काढून घेवून फिर्यादीच्या मानेवर त्यांच्या कडील सुरा ठेवून घरातील कपाटातील वरील नमूद वर्णनाचे एकुण 3 लाख 45 हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने व खिशातील 7 हजार 500 रुपये एवडी रोख रक्कम असे एकूण 3 लाख 52 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल सोन्या चांदीचा ऐवज जबरदस्तीने चोरी करून घेवून गेले असल्याचे नमूद करण्यात आले आहे दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अधिकारी पोसई कदम पुढील करीत आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट

मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन

आठवण शाळेची....उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र. 2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .

पद्म पंडित प्रतिष्ठानच्या वतीने कंदर येथे गुणवंतांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना बॅग तसेच पाण्याची बॉटल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

आज योग दिनाचे महत्त्व व गरज

राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड

पारधी समाज रस्त्यावर, शासनाच्या योजनांपासून वंचित पक्क्या घरासाठी प्रशासनाकडे वंचितचे निवेदन

अज्ञात 5 इसम दोन मोटार सायकलवर आले. मानेवर सुरा ठेवून 3 लाख 52 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले

जावजीबुवाची वाडी ते होले वस्ती मार्ग (रस्ता ग्राम १७७) कॅनल पूलावरून जड वाहतूकीस बंद करण्यात आला आहे.