मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन

By : Polticalface Team ,2025-06-20

मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन

करमाळा प्रतिनिधी 
मराठा सेवा संघ करमाळा च्या वतीने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती करमाळा इ.१ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर / जनरल रजिस्टरवर कुणबी / मराठा-कुणबी / कुणबी-मराठा जातीची नोंद तात्काळ होणेबाबत निवेदन  दिले मराठा सेवा संघाच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे
 शैक्षणिक सत्र २०२५ २६ या वर्षात इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या व ज्या पालकांकडे कुणबी / मराठा-कुणबी / कुणबी-मराठा जातीचा दाखला उपलब्ध आहे अशा विद्यार्थ्यांची जात जनरल रजिस्टर नं १ मध्ये वरीलप्रमाणे नमूद करण्यासंदर्भात आपल्या करमाळा तालुक्यात असणाऱ्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लेखी आदेशित करावे ही नम्र विनती. इयत्ता २ री ते १२ वी पर्यंत शाळेत दाखल असणाऱ्या व ज्या विद्यार्थ्यांचे हिंदू कुणबी / मराठा-कुणबी / कुणबी-मराठा जातीचे दाखले उपलब्ध आहेत अशा विद्यार्थ्यांच्या जनरल रजिस्टर मध्ये जातीची नोंद बदल करण्याचे प्रस्ताव आपल्या कार्यालयामार्फत वरिष्ठ कार्यालयास मंजुरीसाठी सर्व प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनास लेखी आदेशित करावे ही  विनंती मराठा सेवा संघ करमाळा च्या वतीने करण्यात आली हे निवेदन नगरसेवक महादेव अण्णा फंड वरकटनेचे माजी सरपंच बापूसाहेब तनपुरे सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद वरकटण्याचे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब तनपुरे यांच्या हस्ते देण्यात आले या निवेदनावर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे पत्रकार अशोक मुरूमकर आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा तालुक्यातील प्राथमिक शाळा दुसरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सुचित करण्यात येते की जर तुमच्या पाल्याचा कुणबी चा दाखला असेल तर तात्काळ शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून जनरल रजिस्टर वर कुणबी अशी नोंद लावून घ्यावे व ज्यांचा पाल्य इयत्ता पहिली मध्ये टाकायचा आहे आणि त्यांचा दाखला कुणबी चा असेल तर जात डायरेक्ट कुणबीच टाकावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी केले व या संदर्भात प्रत्येक शाळेत प्रत्येक गावामध्ये जाऊन या संदर्भात जागृती करणार असल्याचेही काळे यांनी सांगितले उपस्थितांचे सचिन काळे यांनी आभार मानले हे निवेदन गटशिक्षण अधिकारी जयवंत नलवडे करमाळा व विस्तार अधिकारी नितीन कदम व मिनीनाथ टकले यांनी स्वीकारले व या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ प्रत्येक शाळेमध्ये पत्र देऊन अंमलबजावणी करून घेऊ असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांनी दिले यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले .
यावेळी माहितीस्तव प्रत 
मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. सोलापूर मा. शिक्षणाधिकारी (प्राथ. माध्य) जि.प. सोलापूर मा. तहसीलदार साहेब करमाळा .मा. गटविकास अधिकारी (वर्ग १) पं.स. करमाळा सर्वांना देण्यात आले .


वाचक क्रमांक : Visit counter For Websites



पोलीस उप मुख्यालय बारामती बऱ्हाणपुर येथे मा.श्री संदीपसिंह गिल्ल (भापोसे) पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत एम.आय.डी.सी.परीसरातील उद्योजकांची बैठक संपन्न

पन्हाळा ते पावनखिंड वीर बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा. मराठ्याच्या अतुलनीय पराक्रमाने घोडखिंड झाली पावन.

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा. पाच आरोपी जेरबंद

टाकळी लोणार जि.प.प्रा.शाळेतील आदित्य मोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत निवड

नवरा बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव. आरोपी पती पत्नीवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. आंबेगाव येथील घटना.

तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पती पत्नीला मारहाण करून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. देऊळगाव राजे येथील घटना

शेळ्या चोरणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवली. दोन इसम आंधारामध्ये पळून गेले. एकास दौंड पोलीसांनी पकडले. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

श्रीगोंद्यात मोहरम उत्सव उत्साहात साजरा

अहिल्यानगर जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील शिवपानंद शेख रस्ते प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत , राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

स्वामी चिंचोलीच्या घटनेतील त्या दोन संशयित नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.

शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून दयावी. _जयवंत भाबड

शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश – औरंगाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू

करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन

मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये

आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल