आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

By : Polticalface Team ,22-06-2025

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे लिंपणगाव ( प्रतिनिधी )श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. राजेन्द्रदादा नागवडे आणि सौ. अनुराधाताई राजेन्द्रदादा नागवडे यांच्या संकल्पनेतून श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालायामध्ये संस्थेच्या शिक्षकांसाठी ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि इंदिरा गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिक्षकांसाठी शनिवार दि. २१ जून २०२५ रोजी करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विषद करताना श्री. राजेन्द्रदादा नागवडे यांनी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शिक्षकांनी सर्व सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आणि मुलभूत संकल्पनांच्या आकलनामध्ये परिणामकारक पणे करावा आणि भविष्यातील सक्षम विद्यार्थी घडवावा असे आवाहन केले. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी महावियालायाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेन्द्रदादा नागवडे यांची कार्यशाळा आयोजानामागील भूमिका विषद केली. संस्थेचे निरीक्षक श्री. सचिन लगड यांनीही, शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर परिणामकारक पणे करावा आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरावी हि अपेक्षा व्यक्त केली. कार्याशाळेमध्ये प्रा. अमोल बोराडे, प्रा. गिरमे आणि प्रा. मोहन खोमणे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक श्री. सचिन लगड, प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. चंद्रभान कातोरे, इंदिरा गांधी तंत्रनिकेतन कॉलेजचे प्राचार्य प्रा. प्रशांत भोयटे, संस्थेचे विश्वस्थ प्रा. सुरेश रसाळ, पर्यवेक्षक प्रा. प्रवीण टकले, दोन्ही महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट

मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन

आठवण शाळेची....उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र. 2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .

पद्म पंडित प्रतिष्ठानच्या वतीने कंदर येथे गुणवंतांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना बॅग तसेच पाण्याची बॉटल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

आज योग दिनाचे महत्त्व व गरज

राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड

पारधी समाज रस्त्यावर, शासनाच्या योजनांपासून वंचित पक्क्या घरासाठी प्रशासनाकडे वंचितचे निवेदन

अज्ञात 5 इसम दोन मोटार सायकलवर आले. मानेवर सुरा ठेवून 3 लाख 52 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले

जावजीबुवाची वाडी ते होले वस्ती मार्ग (रस्ता ग्राम १७७) कॅनल पूलावरून जड वाहतूकीस बंद करण्यात आला आहे.