By : Polticalface Team ,01-10-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ३० सप्टेंबर २०२५ दौंड तालुक्यातील मौजे भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादीत भांडगाव ता.दौंड जि.पुणे या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री.अशोक वामन दोरगे (चेअरमन) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि.३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता ग्रामदैवत रोकडोबानाथ मंदिरामध्ये आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी किसन (बाळासो) जयसिंग दिवेकर (सचिव) श्री.अशोक वामन दोरगे (चेअरमन) श्री.रोहीदास विठ्ठल पाटोळे (व्हा.चेअरमन) तसेच दौंड पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे सामाजिक कार्यकर्ते दोरगे सर तसेच भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सचिव श्री किसन (बाळासो) जयसिंग दिवेकर यांनी अध्यक्षांच्या परवानगीने सभेपुढे येणारे विषयासंदर्भात वाचन केले यामध्ये सभेपुढे येणारे विषय नं.१ःदि.२२/०९/२०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृतांत वाचुन कायम करणे. विषय नं.२ः दि.०१/०४/२०२४ ते दि.३१/०३/२०२५ ची वार्षिक हिशोबी पत्रके वाचुन कायम करणे बाबत विषय नं.३ः सन २०२५-२६ या वर्षाकरीता पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.पुणे कडुन कर्ज घेण्याचा व त्यावर सह्या करण्याचे अधिकार मा.संचालक मंडळाला देणे बाबत विषय नं.४ः सन २०२३-२०२४ अखेरचा लेखा परिक्षण पुर्तता अहवाल व सन २०२४-२५ चा अहवाल स्विकृत करुन त्याचा दोषदुरुस्ती अहवाल पाठवणे बाबत विषय नं.५ सन २०२५-२०२६ या कालावधीकरीता शासनाच्या नामनिकेतील वैधानिक लेखापरिक्षक यांची नेमणुक करणे बाबत विषय नं.६ः आपल्यास संस्थेचे शासकीय फेरलेखापरिक्षण किंवा चाचणी लेखापरिक्षण करणेबाबत विषय नं. ७: बिगर खातेदार व १० रु. शेअर्स असणाऱ्या सभासदांना कमी करणेबाबतविषय नं.८ः सभासदांच्या थकबाकी वसुली बाबत विचार करणे.विषय नं. ९ः सन २०२५-२६ च्या अंदाज पत्रकास मान्यता देणे वरील विषयावर उपस्थित सर्व सभासदांनी चर्चा करून घेतलेल्या विषया बाबत काही ठरावाला मंजुरी देण्यात आली. भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा अध्यक्षांच्या परवानगीने विचार करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच संस्थेच्या सभासदांनी अहवाल काळातील काही सूचना किंवा प्रश्न विचारणा करायची असल्यास त्यांनी संस्थेकडे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अगोदर दिनांक २६/०९/२०२५ पर्यंत रीतसर लेखी अर्ज करून कळवावे असे प्रसिद्धी पत्रकार नमूद करण्यात आले आहे ? हा नियम कधीपासून विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये लागू करण्यात आला असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला होता वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना रामदास नारायण दोरगे यांनी मागील काही वर्षांपासून संस्थेत झालेल्या गैरव्यवहारा संदर्भात प्रश्न उपस्थित केले या संदर्भात संस्थेचे सचिव यांनी बोलताना सांगितले शासकीय फेरलेखा परीक्षण किंवा चाचणी लेखापरीक्षण करणे याबाबत सर्वांमते ठराव मंजूर करण्यात आला. रामदास नारायण दोरगे यांनी बोलताना सांगितले की माझे दोन खाती आहेत पत्नी आशाबाई रामदास दोरगे खाते क्रमांक ५७१- यावरील लेखापरीक्षण करावे अशी भूमिका घेऊन ठीक आहे असे सांगितले हा संघर्ष लढा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे प्रथम कर्जमाफी झाल्यापासून फिरलेखा परीक्षण करण्यात यावे असा प्रस्ताव उपस्थित शेतकऱ्यांनी मांडला संस्थेत झालेल्या गैरव्यवहार व गैरकारभाराचे पितळ उघडं पडल्याशिवाय राहणार नाही. सभासदांमध्ये कुजबूज चालू होती वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना रामदास नारायण दोरगे यांना अचानक छातीमध्ये कळ आली असल्याने छातीला हात लावून रामदास नारायण दोरगे सभेतून उठून बाजूला गेले. या प्रसंगी मुलगा महेंद्र रामदास दोरगे सभेच्या ठिकाणी उपस्थित असल्याने वडील रामदास नारायण दोरगे यांना मोटर सायकल वर घेऊन जवळच्या रुग्णालयात प्रथम उपचारासाठी गेले असता डॉक्टरांच्या सांगण्यानुसार पुढील उपचारासाठी पाठवले असता उपचारादरा पुर्वीच रामदास नारायण दोरगे यांचे दुःख निधन झाले भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या गैरव्यवहार प्रकरणी निर्भिड प्रश्न उपस्थित करणारे रामदास नारायण दोरगे यांचा संघर्षमय जीवण प्रवास करत असतानाच संपुष्टात आला याला नेमके जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित झाल्या शिवाय राहत नाही. शेतकऱ्यांचा मनका मोडणारी या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या भ्रष्ट व्यवस्थेतील पदाधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध कठोर कारवाई का करत नाही हाच खरा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे.
अनेक वर्षांपासून संस्थेत झालेल्या गैरव्यवहार बाबत रामदास नारायण दोरगे यांनी वेळोवेळी लेखी स्वरूपात तक्रारी अर्ज केले असून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे. साहाय्यक निबंधक सहकारी संस्था दौंड वरीष्ठ अधिकारी यांच्याकडून भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या गैरव्यवहार प्रकरणी कायदेशीर कारवाई बाबत सकारात्मक भूमिका दर्शवली नसल्याची सभासदांमध्ये चर्चा होत असुन ग्रामीण भागातील सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबाला बळकट करणारी संस्था म्हणजे गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ही संस्था असल्याचे बोलले जाते मात्र या संस्थेत चाललेल्या गैरव्यवहार व भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्य शेतकरी हैरण झाला असल्याची दौंड तालुक्यात चर्चा होत आहे
वाचक क्रमांक :