दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

By : Polticalface Team ,22-11-2025

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड दौंड ता २१ नोव्हेंबर २०२५ दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मतदार जन जागृती अभियानांतर्गत दौंड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 21/11/2025 रोजी दौंड नगरपरिषद व उस्मानअली शाब्दी उर्दू हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहरात मतदार जन जागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मुख्य चौकात मतदार जन जागृती विषयी विद्यार्थी मुला मुलींनी पथनाट्य सादर करून दौंड शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले दौंड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, संविधान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक या ठिकाणी पथनाट्य सादर करून मतदान जागृती करण्यात आली मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावावा व जास्तीत जास्त मतदार नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन दौंड नगरपालिकेने पथनाट्य द्वारे केले, या वेळी दौंड शहरातील बहुसंख्या नागरिकांनी संविधानिक लोकशाही जन जागृती या पथनाट्य कार्यक्रमाचा आनंद घेतला या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅली शहरामध्ये काढण्यात आली. रॅलीमध्ये उपमुख्याधिकारी रवींद्र वाघमोडे, नगर अभियंता, मल्लिकार्जुन बनसोडे, मैनुद्दीन तडवी, प्रशासन अधिकारी विशाल ओहोळ शाळेच्या मुख्याध्यापिका जरीना काझी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका नाईकवाडे के ए सहशिक्षक शेख एन एम चौधरी झेड ए सय्यद अतिक मुंशी आर ए पठाण आर. एफ. हंकारे एम.यू. जमादार एम.ए. आदी सर्व कर्मचारी सहभागी झाले. सदर कार्यक्रमासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक म्हस्के, शहर समन्वयक, गणेश खाडे, तुकाराम तूपसौंदर्य आदींनी परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.