नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

By : Polticalface Team ,05-11-2025

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .! संघर्षक्रांती वृत्तसेवा । श्रीगोंदा दि .४ नोव्हेंबर २०२५ श्रीगोंदा प्रतिनिधी, राज्यात सर्वत्र निवडणुकांच्या चर्चेला जोर चढला असताना श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूकही आता हळूहळू केंद्रस्थानी येऊ लागली आहे. लागलीच निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त होत असून, नगराध्यक्षपदी कोण? या प्रश्नावर गावागावात, चौकाचौकात चर्चेचा विषय रंगत चालला आहे. जुने अनुभवी चेहरे आणि नव्या दमाचे उत्साही उमेदवार अशी स्पर्धा रंगताना दिसत असताना, याच पार्श्वभूमीवर एक नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे ते म्हणजे सौ. इंद्रायणी प्रतापसिंह पाचपुते. नगरपालिकेच्या राजकारणात हे नाव नवीन असले तरी पाचपुते घराण्याच्या राजकीय वारशाशी जोडले गेल्यामुळे या नावाभोवती राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरु झाली आहे. सौ. इंद्रायणी प्रतापसिंह पाचपुते या राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या सूनबाई आणि आमदार ॲड.विक्रमसिंह पाचपुते यांच्या भावजय आहेत. त्यामुळे पाचपुते परिवारातील हे संभाव्य उमेदवार असलेले पहिलेच नाव असल्याने या चर्चेला अधिक वजन मिळाले आहे. श्रीगोंदा नगरपालिकेत जर पाचपुते घराण्याने उमेदवारी केली तर निवडणुकीचा तोल एका क्षणात बदलू शकतो,अशी कार्यकर्त्यांमधील चर्चा रंगली आहे. राजकारणात पाचपुते परिवाराने नेहमीच सर्वसामान्य नागरिकांशी जवळीक ठेवली आहे. कार्यकर्त्यांना सन्मान, जनतेच्या अडचणींमध्ये तत्पर सहभाग आणि विकासाभिमुख भूमिका या गोष्टींमुळे या घराण्याचा जनतेत अजूनही विश्वास कायम आहे. त्यामुळेच सौ.इंद्रायणी पाचपुते यांच्या नावावर चर्चा होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि उत्साह दोन्ही दिसून येत आहेत. या अगोदर पाचपुते घराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत सातत्याने आपली ताकद दाखवली आहे. बहुतेक वेळा विजय मिळवत घराण्याने आपल्या जनाधाराचे वातावरण वाढलेले आहे. जर यावेळी सौ. इंद्रायणी पाचपुते नगरपालिकेच्या रणांगणात उतरल्या, तर या परिवारातील सदस्य म्हणून त्या नगरपालिकेची निवडणूक लढविणाऱ्या पहिल्या महिला उमेदवार ठरतील. एकूणच, श्रीगोंद्यातील राजकारण सध्या सस्पेन्स मोडमध्ये आहे. पाचपुते कुटुंबाने जर सौ.प्रतापसिंह इंद्रायणी पाचपुते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, तर श्रीगोंदा नगरपालिकेची लढत नक्कीच रंगतदार आणि ऐतिहासिक ठरणार, असा विश्वास कार्यकर्त्यांचा आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड नगरपरिषद मतमोजणी दि.२१ रोजी स्ट्राँगरुम शासकीय धान्य गोदाम (मदर तेरेसा चौक) येथे सकाळी १० वाजता होणार

केडगाव पाटबंधारे शाखेत सावळा गोंधळ. निवासी शाखा अधिकारी कर्मचारी मिळतील का ? वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ?

केडगाव स्टेशन (बोरीपार्थी) पाटबंधारे वसाहत सार्वजनिक श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदत्त पालखी मिरवणूक. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.