स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

By : Polticalface Team ,26-10-2025

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

आपल्या तालुक्यातील राजकारण आज एका विचित्र वळणावर येऊन ठेपलं आहे. एकीकडे गावोगावी तरुण कार्यकर्ते, शिक्षक, शेतकरी, व्यापारी समाजकार्यासाठी पुढे येत आहेत, पण दुसरीकडे सत्तेची सूत्रे काही मोजक्या घरांमध्येच फिरताना दिसतात.


अलीकडेच आपल्या परिसरात झालेल्या चर्चेत पुन्हा एक उदाहरण समोर आलं — आमदारांचा मुलगा पुन्हा आमदार, दुसरा मुलगा जिल्हा परिषदेची तयारी, पुतण्या सरपंच, तर सुनबाई नगराध्यक्ष पदासाठी तयारी करत आहेत.

लोकशाहीत प्रत्येकालाच उमेदवारीचा अधिकार आहे, पण लोकांच्या मनात प्रश्न उमटतो — राजकारण जनतेसाठी की घराणेशाही साठी?


सामान्य कार्यकर्ता वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करतो. पावसात, उन्हात झेंडे उचलतो, लोकांपर्यंत योजना पोहोचवतो, पण निवडणुकीच्या वेळी मात्र त्याचं नाव उमेदवारीच्या यादीत दिसत नाही.

कारण तिकीट आधीच ‘घरात’ ठरलेलं असतं.

ही भावना कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष आणि निराशा निर्माण करते.

या घराणेशाहीचं सर्वात मोठं नुकसान म्हणजे — नवं नेतृत्व थांबतं.

आपल्या गावात, तालुक्यात किती हुशार तरुण आहेत, ज्यांना जनतेसाठी काम करण्याची उमेद आहे. पण त्यांना राजकारणात प्रवेश मिळतो पण ऐन वेळी तिकीट डावळलून घराणेशाही ला प्राधान्य दिले जाते. कारण राजकारण म्हणजे आता वंशपरंपरा झालं आहे, विचारसंपत्ती नव्हे.

निश्चितच, काही राजकीय कुटुंबांनी चांगलं काम केलं आहे. विकासकामे केली, विश्वास जिंकला — हे सत्य नाकारता येत नाही. पण सत्तेचा वापर जनतेसाठी झाला पाहिजे, घरासाठी नव्हे, हेही तितकंच खरं आहे.


आता जनता जागी होत आहे. लोक विचारायला लागले आहेत —

 “माझ्या गावात रोजच्या समस्या सुटत नाहीत, पण पदं मात्र त्याच घरात का जातात? विकासासाठी इतरांना संधी देऊन पाहण्यासाठी काय हरकत आहे.”


आज गरज आहे ती जनतेतील नेतृत्वाची.

राजकारणात नवीन चेहरे आले पाहिजेत, तरच लोकशाही जिवंत राहील.जनतेनं ठरवायचं आहे — आपण मत देतोय कामाला की घराणेशाहीला?

जर लोकांनी विचारपूर्वक निर्णय घेतला, तर खऱ्या अर्थानं आपला तालुका, आपला जिल्हा आणि आपला महाराष्ट्र घराणेशाही मुक्त होईल आणि लोकशाही टिकेल.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

केडगाव पाटबंधारे शाखेत सावळा गोंधळ. निवासी शाखा अधिकारी कर्मचारी मिळतील का ? वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ?

केडगाव स्टेशन (बोरीपार्थी) पाटबंधारे वसाहत सार्वजनिक श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदत्त पालखी मिरवणूक. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न