By : Polticalface Team ,09-09-2025
श्रीगोंदा (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकार बांधवांनी समाजाभिमुख लिखाण करून अन्याय पीडित लोकांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन श्रीगोदा तालुका पत्रकार संघाचे सचिव मेजर भीमराव उल्हारे यांनी कार्यकारिणीच्या आयोजित बैठकीत बोलताना व्यक्त केले श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक श्रीगोंदा येथील शासकीय विश्रामगृहावर तालुका अध्यक्ष डॉ. अमोल झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष माधव बनसुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना तालुका सचिव श्री उल्हारे म्हणाले की, पत्रकारिता हे देशाचा चौथा स्तंभ म्हणून आज संपूर्ण देश सूक्ष्म नजरेने पत्रकारांकडे पाहत आहे. न्यायव्यवस्थेपैकी पत्रकारांची भूमिका देखील देशाच्या जडणघडणीत मौलिक भूमिका ठरली आहे. तेव्हा ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांनी अन्याय पीडित लोकांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, विविध शासकीय योजना याबरोबरच ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या समस्या या प्रत्येक पत्रकारांनी जाणून घेतल्या पाहिजे. असे सांगून श्री उल्हारे पुढे म्हणाले की, पत्रकार संघातील सर्व पत्रकार बांधव अगदी तळमळीने लिखाण करतात. परंतु यापुढे प्रत्येक पत्रकारांच्या ज्या त्या वृत्तपत्रांमध्ये किमान दररोज दोन बातम्या प्रसिद्ध झाल्या पाहिजे. त्यातून समाजाच्या भावना देखील जाणून घेतल्या पाहिजे. प्रशासन आणि समाज या दोघांचा समन्वय साधून शासकीय दरबारी प्रलंबित प्रश्नांना देखील आवाज उठवण्याची आज नितांत गरज असल्याचे श्री उल्हारे यांनी सांगून ते आणखी पुढे म्हणाले की, पत्रकार भवन व पत्रकारांसाठी वसाहत यासाठी लोकप्रतिनिधी व तालुका प्रशासनाकडे तात्काळ पाठपुरावा करणार असल्याचे श्री उल्हारे यांनी सांगितले. याबरोबरच पत्रकारांसाठी पेन्शन योजना यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार आहोत. असे उल्हारे यांनी यावेळी बोलताना सांगितले याप्रसंगी राज्य व जिल्हा पत्रकार संघाच्या नियमावलीचे पत्रकारांनी पालन करावे असे यावेळी सूचित करण्यात आले. याप्रसंगी संघर्षनामा मल्टीमीडियाकडून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकार संघातील सर्व उपस्थित पत्रकारांचा मानचिन्ह देऊन गौरव देखील यावेळी संघर्षनामाचे संपादक मेजर भीमराव उल्हारे यांनी केला. या बैठकीस पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष डॉ अमोल झेंडे, जिल्हा उपाध्यक्ष माधव बनसुडे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नंदकुमार कुरुमकर, उपाध्यक्ष सचिन शिंदे, पत्रकार संघातील पदाधिकारी नितीन रोही, किशोर मचे धनेश गुगळे, सतीश ओहळ, वैभव हराळ, पल्लवी शेलार आधी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष नंदकुमार कुरुमकर यांनी मानले.
वाचक क्रमांक :