दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
By : Polticalface Team ,05-09-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
दौंड ता ०५ सप्टेंबर २०२५ दौंड तालुक्यातील मौजे केडगाव
ता दौंड जिल्हा पुणे येथील रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी
पंढरपूर या ठिकाणी राज्य स्तरीय बॅडी स्केटिंग आईस हॉकी स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून मुले आली होती यामध्ये मुंबई ठाणे पुणे ग्रामीण कोल्हापूर सातारा सांगली धाराशिव अहिल्यानगर संभाजीनगर सोलापूर वर्धा नागपूर या जिल्ह्याने यामध्ये सहभाग नोंदवाला होता. ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्याचे नेतृत्व करत पाच संघ खेळून या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षण प्रमुख समाधान दाणे यांनी दिली
पुढे बोलताना ते म्हणाले 10 वर्षा खालील मुलांनी सिल्वर मेडल
ऋत्विक कुंभार साईराज पाटोळे अर्णव कुंभार रुद्र गोसावी राजवीर मोरे शिवांश कोरेकर 10 वर्षा खालील मुली सिल्वर मेडल दिशा कुंजीर आर्वी टुले गौरी सांगडे मृणाली खंडाळे काव्या थोरात 14 वर्षा खालील मुली सिल्वर मेडल अनन्य पारखे लीला मोरे तेजल टकले 14 वर्षा खालील मुले गोल्ड मेडल अंश यादव क्षितिज कुंभार रुद्र आहेरकर ओम शिंदे गुरुबाज सिंह नाहर आर्यन कुंभार
17 वर्षा खालील मुले हरगुण सिंग नाहर अजित पवार हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले सुखमिलन सिंग नाहर या मुलांनी पुणे जिल्ह्याचे तसेच दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला आहे या सर्व मुलांनी गेली दोन वर्षा पासून ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून सराव करत आहेत.
या सर्व मुलांना प्रशिक्षण समाधान दाणे गणेश घुगे आकाश कसबे कांचन नेवसे अनुराधा निकम तसेच मार्गदर्शन डॉक्टर लोणकर संदीप टेंगले विजय तीपूगडे यांनी केले तसेच शुभेच्छा प्रियंका दाणे रूपाली टेंगले तसेच समस्त दौंड व केडगाव चौफुला ग्रामस्थांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
वाचक क्रमांक :