निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
By : Polticalface Team ,18-09-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १९ सप्टेंबर २०२५ माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या राज्यव्यापी अधिवेशन सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी अधिवेशन कार्यक्रम संपन्न झाला.
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या वतीने या वर्षी देण्यात येणारा उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार २०२५ दौंड तालुक्यातील मौजे यवत तालुका दौंड जिल्हा पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार दत्तात्रय अवचट यांना देऊन सन्मानित करण्यात आले
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या राज्यव्यापी अधिवेशन कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील काही निवडक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी २०१७ पासून माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या दौंड तालुक्यातील मौजे यवत येथील सामाजिक कार्यकर्ते व राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार दत्तात्रय अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार २०२५ निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे व महासंघाची संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. राहुलकुमार अवचट हे गेल्या १० वर्षा पासून माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत असून ते अनेकांना माहिती अधिकार अर्ज, प्रथम अपील, द्वितीय अपील, या संदर्भात सखोल माहिती नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी व मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहेत
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन यांच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल राहुलकुमार अवचट यांनी सुभाष बसवेकर, प्रशिक्षक रेखा साळुंखे, यशदाचे दादू बुळे यांच्या मार्गदर्शनामुळे व माहिती अधिकार महासंघाचे पदाधिकारी, पुणे जिल्ह्यातील सर्व सहकारी व माहिती अधिकार कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्याने हा पुरस्कार मिळाला असल्याचे सांगत सर्वांचे आभार व्यक्त करून हा पुरस्कार माझा नसून माहिती अधिकार कायद्या बाबत प्रचार व प्रसार करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा आहे या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असून यापुढे ही माहिती अधिकार कायद्याच्या प्रचार व प्रसारासाठी सदैव कार्यरत राहील प्रत्येक नागरिकांना कायद्याची माहिती होण्यासाठी व शासकीय अधिकाऱ्यांना कायद्याबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी तसेच माहिती अधिकार कायद्याचा जास्तीत जास्त वापर नागरिकांनी करावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे राहुलकुमार अवचट यांनी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जितेंद्र भावे, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर, पश्चिम महाराष्ट्राचे संजय किणीकर, महाराष्ट्राचे प्रसिद्धीप्रमुख राहुल कदम आदी मान्यवरांच्या हस्ते, महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय किणीकर यांनी प्रास्ताविक भाषण केले.या प्रसंगी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र भावे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले बोलताना ते म्हणाले माहिती अधिकार कार्यकर्ता हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी कायदेशीर कागदावर लढत असतो तर निर्भय महाराष्ट्र पार्टी रस्त्यावर उतरून लढत आहेत हे दोघे एकत्रित झाल्यास प्रशासकीय कामात मोठा बदल घडवून आणू शकतात. या दोघांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या विरोधात काम करावे अशी अपेक्षा निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र भावे यांनी बोलताना व्यक्त केले. या वेळी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले व माहिती अधिकार बरोबरच घटनेच्या इतर कायद्यांचा देखील अभ्यास करावा असे आवाहन केले.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष