श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

By : Polticalface Team ,20-10-2025

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न. . श्रीगोंदा माधव बनसुडे:- गेले नऊ वर्षापासून श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटना दरवर्षी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करते. याही वर्षी श्रीगोंदा बुद्धिबळ संघटना, डॉ. लाड (मातोश्री ग्रामीण रुग्णालय काष्टी )व अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 2025 च्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचेही सहकार्य लाभले. संघटनेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा या ठिकाणी रविवार दिनांक 19/10/2025 रोजी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली बुद्धिमत्ता आणि खेळातील कौशल्य दाखवले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मातोश्री ग्रामीण रुग्णालय काष्टी येथील डॉ. नवनाथ लाड,डॉ. प्रसाद लाड, डॉ. सौ श्वेता लाड, डॉ.सौ. आशा मचे व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सूर्यवंशी सर यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी मनोहरजी लकडे, दक्ष नागरिक फाउंडेशनचे दत्ताजी जगताप श्रीरंगजी साळवे व शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन चे अध्यक्ष राजेशजी इंगळे हेही उपस्थित होते. स्पर्धेत एकूण 95 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला व सर्वांनी जिंकण्यासाठी आपल्या बुद्धीची जोरदार कसोटी लावली. ही स्पर्धा चार वेगवेगळ्या गटात खेळवली गेली त्यातील खुला गटात क्षितिज मोरे प्रथम क्रमांक , दीपक सुपेकर द्वितीय क्रमांक, व अतुल बोरुडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. वीस वर्षा आतील गटात आदित्य गायकवाड प्रथम क्रमांक, क्रतू माने द्वितीय क्रमांक व विराज मचे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. 14 वर्षाखालील गटात वेदांत दळवी प्रथम क्रमांक, प्रत्युष पवार द्वितीय क्रमांक व सत्यजित वेठेकर तृतीय क्रमांक मिळवून विजेते राहिले. या स्पर्धेत महिलावर्गही मागे राहिल्या नाहीत त्यांचीही उपस्थिती उल्लेखनीय होती व त्यांच्या तील महिला गटात प्राजक्ता कोथिंबिरे प्रथम क्रमांक, कार्तिकी शिंदे द्वितीय क्रमांक व श्रावणी ताडे तृतीय क्रमांक मिळून विजेत्या ठरल्या. अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष धीरज डांगे यांनी दिली! या धकाधकीच्या जीवनात बुद्धिबळ संघटना अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करून स्पर्धकांना एक व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या उपक्रमास बऱ्याच अदृश्य हातांची मदत लाभत आहे. यावर्षी डॉ. लाड मातोश्री ग्रामीण रुग्णालय काष्टी यांच्यावतीने विजेत्यांसाठी रोख रुपयाचे व सन्मान चिन्हाचे वाटप करण्यात आले. गुगळे मोबाईल शॉपी व गुगळे ज्वेलर्स यांच्या मार्फत सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांसाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्रिमूर्ती भेळ सेंटरचे चंद्रकांतजी चौधरी यांच्याकडून अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभय शिंदे यांनी बोलताना दिली श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटना अशा प्रकारचे स्पर्धेचे आयोजन नियमितपणे करत राहील व सर्व स्पर्धकांना असेच प्रोसाहीत करत राहील अशी ग्वाही देऊन सर्वांचे आभार संघटनेचे सचिव गणेश गुगळे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. योगेश शेलार यांनी केले.स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी दीपक सुपेकर,अतुल बोरुडे,धनेश गुगळे,सतीश शिंदे सर आणि विठ्ठल होले यांनी विशेष मेहनत घेतली.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई