By : Polticalface Team ,09-09-2025
श्रीगोंदा प्रतिनिधी श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव येथे गाव अंतर्गत कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्याचे काम सुरू असून कामाची रक्कम अंदाजे पंधरा लाख रुपये इतकी असून या बंधाऱ्याची काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असताना देखील श्रीगोंदा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत सदरचे काम सुरू पेडगाव ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी रजेवर असल्याचा व श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामपंचायत ची कार्यशाळा सुरू असल्यामुळे बंधाऱ्याकडे कोणी ही येणार नाही असं समजून संबंधित ठेकेदारांनी काँक्रीटमध्ये चक्क जेसीबीच्या सहाय्याने दगडाचा वापर करून काम सुरू आहे तसेच काँक्रीट कामासाठी व्हायब्रेटर चा कसल्याही प्रकार वापर होत नसुन भयुष्यात बंधाऱ्याला धोका निर्माण होणार हे मात्र नक्कीच यापूर्वीच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे
वाचक क्रमांक :