श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

By : Polticalface Team ,09-11-2025

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड दौंड ता ०९ नोव्हेंबर २०२५ : यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये दरवर्षी काळष्टमीनिमित्त श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम सप्ताह सोहळा दि ०६ नोव्हेंबर पासून ते १३ नोव्हेंबर पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाल्याने यवत नगरी मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम सप्ताहाचे ५८ वर्ष पूर्ण होत आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने कलश, ग्रंथ, वीणा पूजन करून सप्ताह प्रारंभ करण्यात आला. हरिनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नेहमी प्रमाणे सायंकाळी ५: वाजे सुमारास ह.भ.प धनवटे महाराज (भांडगाव) यांचे प्रवचन झाले तर रात्री ह.भ.प. दत्तात्रय महाराज फरांदे (लिंबूत) यांचे कीर्तन संपन्न झाले श्री काळभैरवनाथ जन्मोत्सवाच्या निमित्ताने यवत पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील भजनी मंडळांनीही उस्फूर्तपणे उपस्थिती दर्शविली आहे. या पारंपारिक हरिनाम सप्ताहाने यवत नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविक भक्तांनी मंदिरामध्ये मोठ्या संख्येने गर्दी दिसून येत आहे. श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये रोज काकड आरती, महापूजा अभिषेक, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज गाथा भजन, हरिपाठ, हरीजागर यांसह ७ नोव्हेंबर रोजी सायं. ५ वा ह.भ.प. रवि काका अत्रे (खोर) यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ या वेळेत ह.भ.प बंकट महाराज ढवळे (हिंगणीबेर्डी) यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न होणार आहे. दि.०८ नोव्हेंबर रोजी ह.भ.प उत्तम महाराज ढवळे (वडगाव रासाई) यांचे प्रवचन तर ह.भ.प दत्तात्रय महाराज सुळसकर (कासुर्डी) यांचे कीर्तन, दि. ०९ रोजी ह.भ.प नाना महाराज शितोळे (पाटस) यांचे प्रवचन तर ह.भ. गहिनीनाथ महाराज खेडकर (बीड) यांचे कीर्तन, दि.१० रोजी ह.भ.प सुमंत महाराज हंबीर (पाटेठाण) यांचे प्रवचन तर ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज देशमुख (पंढरपूर) यांचे कीर्तन, दि. ११ रोजी ह.भ.प सदाशिव महाराज कामठे (फुरसुंगी) यांचे प्रवचन तर ह.भ.प गणेश महाराज शिंदे (उदापूर) यांचे कीर्तन, १२ रोजी श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सो-हळा निमित्त सायंकाळी ४ वाजता श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी भव्य दिंडी सोहळा व रात्री १० वा. ह.भ.प केशव महाराज उखळीकर (परळी वैजनाथ) यांचे जन्मोत्सव कीर्तन व नंतर नाथांचा गोंधळ होईल. दरम्यान, सप्ताह काळात रोज दुपारी व सायंकाळी महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. यवत परिसरातील समस्त ग्रामस्थांनी या जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, विठ्ठल समाज भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळ यवत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

केडगाव पाटबंधारे शाखेत सावळा गोंधळ. निवासी शाखा अधिकारी कर्मचारी मिळतील का ? वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ?

केडगाव स्टेशन (बोरीपार्थी) पाटबंधारे वसाहत सार्वजनिक श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदत्त पालखी मिरवणूक. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न