करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

By : Polticalface Team ,22-06-2025

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका करमाळा प्रतिनिधी दि. २०/०६/२०२५ रोजी पो.नि./ रणजीत माने यांना गोपणीय माहीती मिळाली की, कमलाभवानी लॉज, भवानी पेठ, करमाळा या ठिकाणी एक इसम अवैध कुंटणखाना चालवित आहे, अशी गोपणीय माहीती प्राप्त होताच त्यांनी सदर बाबत छापा कारवाई करणे करीता मा. उपविभागीय पोलीस अधीकारी, श्री. अजित पाटील साो. करमाळा उपविभाग, करमाळा यांना माहीती देवून छापा कारवाई करीता अधिकारपत्र घेवून छापा कारवाई करणे करीता स.पो.नि./ पोपट टिळेकर, स.पो.उप. निरी./विश्वास शिनगारे, स.पो.उप. निरी. / दादासाहेब वाडगे, पो.हवा./१८२८ भाऊराव शेळके, पो. हवा./१५० आप्पासाहेब लोहार, पो. शि./१६७ मिलींद दहिहांडे, पो.शि./११४२ स्वप्नील शेरखाने व म.पो.शि./१९०८ शितल पवार, सर्व नेमः करमाळा पोलीस ठाणे याना बोलावून घेवुन छापा कारवाईकामी मागदर्शन करुन, दोन पंच व बनावट गिऱ्हाईक सह व साहीत्यासह, शासकिय वाहनाने कारवाईसाठी १८:०९ वा. रवाना होवून त्या ठिकाणी लॉजमधील खोलीमध्ये जावुन छापा कारवाई करुन तेथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच त्यानंतर सदर ठिकाणी मिळुन आलेला इसम नामे प्रथमेश सुनिल राठोड, वयः २२ वर्षे, रा. भवानी पेठ, करमाळा याचेकडे पोलीसांनी पंचासमक्ष विचारणा केली असता त्याने नमुद लॉज हे त्यांच्याच मालकीचे असल्याचे सांगुन त्यामध्ये तो नमुद महीलांकरवी वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक गिऱ्हाईकामागे त्यास ५००/- रुपये मिळतात असेही त्याने सांगीतले. त्यामुळे इसम नामे प्रथमेश सुनिल राठोड, वयः २२ वर्षे, रा भवानी पेठ, करमाळा हा इसम वेश्याव्यवसायासाठी महीला पुरवत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुध्द पो.हवा. /१८२८ भाऊराव उत्तरेश्वर शेळके, वयः ४२ वर्षे, नेमः करमाळा पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिल्याचे आरोपी नामे प्रथमेश सुनिल राठोड, वयः २२ वर्षे, रा भवानी पेठ, करमाळा याचे विरुध्द भा.न्या.सं. कलम १४३ (२), १४४ (२), सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५,६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास स्वतः पो. नि. / रणजीत माने हे करीत आहेत. तसेच पिडीत महीला यांना मा. न्यायालयात हजर करुन मा. न्यायालयाचे आदेशाप्रमाणे त्यांचे वैद्यकिय तपासणीकामी त्यांना महिला पोलीस अंमलदार यांच्या मार्फतीने खाना करण्यात आले आहे. सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो. सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो. श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील साो. करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. / रणजीत माने, स.पो.नि./ पोपट टिळेकर, स.पो.उप.निरी./विश्वास शिनगारे, स.पो.उप.निरी. / दादासाहेब वाडगे, पो. हवा./१८२८ भाऊराव शेळके, पो. हवा./१५० आप्पासाहेब लोहार, पो.शि. / १६७ मिलींद दहिहांडे, पो.शि./११४२ स्वप्नील शेरखाने व म.पो.शि./१९०८ शितल पवार, सर्व नेमः करमाळा पोलीस ठाणे यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट

मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन

आठवण शाळेची....उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र. 2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .

पद्म पंडित प्रतिष्ठानच्या वतीने कंदर येथे गुणवंतांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना बॅग तसेच पाण्याची बॉटल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

आज योग दिनाचे महत्त्व व गरज

राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड

पारधी समाज रस्त्यावर, शासनाच्या योजनांपासून वंचित पक्क्या घरासाठी प्रशासनाकडे वंचितचे निवेदन

अज्ञात 5 इसम दोन मोटार सायकलवर आले. मानेवर सुरा ठेवून 3 लाख 52 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले

जावजीबुवाची वाडी ते होले वस्ती मार्ग (रस्ता ग्राम १७७) कॅनल पूलावरून जड वाहतूकीस बंद करण्यात आला आहे.