छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
By : Polticalface Team ,22-06-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी )श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि टी.एस.पी.एल. ग्रुप, पुणे यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने प्लेसमेंट सेलमार्फत शुक्रवार दिनांक २० जून २०२५ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रांजणगाव व सुपा येथील हाएर ॲपलियनसेस इंडिया लि., फियाट इंडिया ऑटोमोबाईल आणि सुपा येथील यु.के.बी. इलेक्ट्रॉनिक्स व युनो मिंडा लि.येथील कंपनीतील मुलाखतीद्वारे ३० विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्यांनी दिली.
नागवडे कारखान्याचे व्हॉईस चेअरमन बाबासाहेब भोस यांनी स्वागत समारंभास अध्यक्ष म्हणून संबोधित करताना "छत्रपती कॉलेजमधील विद्यार्थ्यांना राजेंद्र (दादा) नागवडे आणि विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कॅम्पस मुलाखतीमधून हाताला काम मिळत आहे. बापूंचे खऱ्या अर्थाने स्वप्न साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले". या प्रसंगी जिल्हा बँक संचालिका सौ. अनुराधाताई राजेंद्रदादा नागवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि धाडसाने मुलाखतीस सामोरे गेले पाहिजे.भारतात सर्वात जास्त हुशार व्यक्ती असून मोठ्या कंपनीच्या मुख्य पदावर भारतीय व्यक्ती असल्याचे नमूद केले. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा रहावा म्हणून नागवडे कुटुंब निःस्वार्थी भावनेने काम करत आहे आणि पुढेही करत राहणार असल्याचे नमूद केले.
प्रास्ताविक आणि टीमची ओळख महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी करून दिली. कंपनीच्या वतीने श्री संजय ठुबे यांनी कंपनी आणि कामाचे स्वरूप याची माहिती दिली. सोबत देवा कार्ले , माधव साखरे, कल्पेश पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण नागवडे यांनी केले तर डॉ.विलास सुद्रिक यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रम प्रसंगी नागवडे कारखान्याचे संचालक भाऊसाहेब बरकडे, सुरेखाताई लकडे, प्रा.सुरेश रसाळ, सामजिक कार्यकर्ते मुकुंद सोनटक्के, अध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात अनेक संधी तरुण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्या. यासाठी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील पदवीच्या अंतिम बरीक्षेस बसलेल्या आणि पदवी ग्रहण केलेल्या १२० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. विविध कॉलेजमधील ५० विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला. त्यापैकी एकूण ३० विद्यार्थ्यांची नोकरीसाठी अंतिम निवड झाली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, जिल्हा बँक संचालिका सौ.अनुराधाताई नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ, व कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष