By : Polticalface Team ,2025-06-25
बारामती जन आधार न्युज प्रतिनिधी. भिमसेन जाधव मो.911213161616
बारामती शहरामध्ये अंत्यविधी वाहनाची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनाची सकारात्मक दखल घेण्यात आली आहे. या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर बारामती नगरपरिषदेकडून नविन, सुसज्ज आणि अत्याधुनिक अंत्यविधी वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शहरातील गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांतील कुटुंबांना अंत्यविधीच्या वेळेस अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी या विषयावर आंदोलनात्मक पद्धतीने आवाज उठवून नगरपरिषदेला निवेदन दिले होते.
या निवेदनाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री पदावरून मिळालेल्या विशेष सहकार्यामुळे नगरपरिषदेकडून नविन शववाहिनी वाहन लवकरच वापरासाठी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपरिषदेच्या प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकातून देण्यात आली.
या यशाबद्दल जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी बारामती नगर परिषदेचे विशेष आभार मानले असून, ही सुविधा गरजू नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आघाडी सातत्याने जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे शहरातील अंत्यविधी सेवेमध्ये सुसंगत सुधारणा होणार असून, सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेऊन काम करणाऱ्या वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश लाभले आहे.
वाचक क्रमांक :