यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,27-06-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
दौंड ता २७ जून २०२५ दौंड तालुक्यातील मौजे ता दौंड जिल्हा पुणे येथील यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर घाटाचे पायाथ्याला शेरु रिसॉर्टकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याचे बाजुला सापडला अज्ञात पुरुषाचा जळालेला मृतदेह नेमका कोणाचा या बाबत यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख व पोलीस प्रशासनाकडून शोध मोहीम तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती देशमुख यांनी दिली
या बाबत अधिक माहिती अशी की यवत पोलीस स्टेशन येथे
फिर्यादी विनायक अशोक हाके पोलीस हवालदार नेमणुक यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रमीण. यांच्या तक्रारी वरून बी.एन.एस. कलम गु.र.नं.55 3/2025 बी.एन.एस. कलम 103(1) 238 103(1) 238 अंन्वये अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
हि धक्कादायक घटना दि 27/6/2025 रोजी सकाळी 09: वाजे पुवी नक्की वेळ समजुन येत नाही मौजे यवत ता दौड जि पुणे गावच्या हद्दीत भुलेश्वर घाटाचे पायाथ्याला शेरु रिसॉर्टकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याचे बाजुला अनोळखी जळालेला अज्ञात पुरुषाचा मृतदेह यवत पोलिसांना मिळून आला असुन मयताचे नाव-अज्ञात पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे 30 ते 35 वर्ष असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सारांश-वर नमुद केले तारीख वेळी व ठिकाणी यातील अनोळखी पुरुष जातीचे इसमास कोणीतरी अज्ञातांनी कोणत्यातरी तीव्र धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यावरती उजव्या बाजूला छातीवर व पाठीवर गंभीर वार करुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने कसले तरी ज्वालाग्रही पदार्थ मयताचे शरीरावर टाकुन त्यास पेटवुन जीवे ठार मारले आहे.
(सदर हा मृतदेह नेमका कोणाचा आहे हे अध्याप समजू शकले नाही यवत पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू आहे या अनोळखी अज्ञात पुरुष मृतदेहा बाबत कोणास काही माहिती असेल तर यवत पोलिसांना कळविण्यात यावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे )
वगैरे मजकुरचे फिर्यादी वरुन यवत पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस हवालदार संतोष कदम
मो नं 7350653653 तपासी अंमलदार साहाय्यक पोलीस पो नि महेश माने मो नं 8149729865
वाचक क्रमांक :