यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
By : Polticalface Team ,03-08-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
दौंड ता ०३ ऑगस्ट २०२५ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील श्री निळकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची तोडफोड व विटंबना झाल्याची घटना दि २६/०७/२०२५ रोजी रात्री १ वाजे सुमारास घडली होती
या संदर्भात यवत गाव दि २७/०७/२०२५ रोजी कडकडीत बंद ठेवून सर्व नागरिकांनी निषेधार्थ मोर्चा काढला सदर घटनेतील आरोपी फरार झाला होता मात्र दि २९ रोजी रात्री उशिरा यवत पोलीस प्रशासनाने घटनेतील आरोपी ताब्यात घेतला आहे असल्याने सदर आरोपीस कठोर शिक्षा व्हावी या हेतूने पोलीस प्रशासनाच्या कामा बाबत नाराजी व्यक्त करत जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते
या बाबत दौंड तालुक्यातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला संपूर्ण दौंड तालुका बंद ची हाक दिली होती याच दिवशी यवत येथील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करत गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला या प्रसंगी संध्याकाळी निषेध सभा आयोजित करण्यात आली या वेळी गोरक्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेचे अक्षय कांचन महेश दोरगे रशिका ताई वरुडकर आदी युवा तरुण कार्यकर्ते या निषेध सभेला उपस्थित होते अनेकांनी जोरदार फटकेबाजी करत भाषणं केली गावातील युवा तरुण मावळा जागा झाला परिस्थिती बिघडू नये या दृष्टीने यवत ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यवत ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले दिनांक ३०/०७/२०२५ रोजी सकाळी ११ वाजे सुमारास श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात आली
या वेळी यवत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. या प्रसंगी विशेष ग्रामसभेमध्ये महत्वाचे विषयावर तसेच घडलेल्या घटनेतील फरार असलेला आरोपी तत्काळ अटक करा. बेकायदेशीर अतिक्रमण हटाव. गावातील अवैद्य धंदे तत्काळ बंद करा. पोलीस प्रशासन व महसूल विभागातील तसेच पुरवठा विभागातील बेकायदेशीर कामांना आळा घाला. यवत गावातील मुख्य चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्या उभारणी करा. यवत गावातील बेकायदेशीर मस्जिद पाडण्यात याव्यात. यवत गावातील बाहेरून आलेल्या नागरिकांची चौकशी करून. बेकायदेशीर अनाधिकृत बांधकाम पी एम आर डी विभागाच्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करा. दौंड महसूल विभाग अंतर्गत असलेल्या यवत येथील महा ई सेवा केंद्रात चाललेला बेकायदेशीर कारभार तत्काळ बंद करा. आधार कार्ड रेशनिंग कार्ड. मतदान कार्ड. त्यांच्या मुळ गावातील कागदपत्रे रद्द करा केले आहे का? या बाबत पूर्ण चौकशी केल्या शिवाय देऊ नये या बाबत संबंधित विभागाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अशा अनेक प्रकारच्या गाव गाड्यातील शासकीय कामा बाबत प्रशासनाने चोख कामगिरी बजावली पाहिजे या बाबत विशेष ग्रामसभेमध्ये ठराव करण्याची उपस्थित नागरिकांनी मागणी करुन सर्वामते ठराव मंजूर करण्यात आला असल्याचे सरपंच समीर दोरगे व ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी या वेळी सांगितले या प्रसंगी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे उपसरपंच सुभाष यादव माजी उपसरपंच नाथा आबा दोरगे माजी उपसरपंच सदानंद दोरगे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित असुन यवत गावातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी
यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख महसूल विभाग मंडल अधिकारी गावं कामगार तलाठी. पी एम आर डी विभाग अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते यवत ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा आरोप कृती आरोप करत पार पडली
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची तोडफोड व विटंबनेच्या निषेधार्थ दि ३१/०७/२०२५ रोजी दुपारी ४: वाजे दरम्यान हिंदू जनआक्रोश मोर्चा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला प्रमुख वक्ते जगदगुरु स्वामी हेमांगी सखीजी वैष्णव किन्नर आखाडा प्रमुख व महाराष्ट्र राज्यातील आमदार गोपीचंद पडळकर तसेच आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार फटकेबाजी करत भाषणं झाली यवत गावातील युवा तरुण मावळे शांत झाले यवत गावातील परिस्थिती आटोक्यात आली होती. यवत पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी मेहनत घेऊन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी कामगिरी बजावली मात्र त्याच रात्री एका माथेफिरूने फेसबुक व्हाट्सअप वर पोस्ट व्हायरल केली शुक्रवार दि १ ऑगस्ट २०२५ रोजी यवत गावांमध्ये युवा तरुण मावळे खळबळून जागे झाले बघता बघता जमाव वाढत गेला शुक्रवार बाजार दिवस असल्याने अनेक नागरिकांची धावपळ उडाली
यवत परीसरातील सहकार नगर येथे राहत असलेल्या एका माथेफिरूने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली यवतमध्ये तणाव निर्माण झाला मोठ्या जमावाने यवत गाव बाजार पेठेत दगडफेक गराडे वस्ती परिसर पत्रा शेड तोडफोड यवत रेल्वे स्टेशन रोड. इंदिरा नगर परिसरात बेकरी तोडफोड दगडफेक घरे आणि दुकानांवर दगडफेक झाली
यामध्ये कोणी जखमी किंवा कोणाची जीवीतहानी झाली नाही मात्र तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले जमाव परिस्थिती बिघडत चालली होती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत कामगिरी बजावली बारामती विभाग उपाधीक्षक गणेश बिरादार दौंड विभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी जमाव शांत करण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी यवत गावातील सुरेश भाऊ शेळके. दिलीप यादव सरपंच समीर दोरगे उपसरपंच सुभाष यादव माजी उपसरपंच सदानंद दोरगे या प्रमुख व्यक्तींनी पुढाकार घेऊन जमलेला शांत करण्यात पोलीस प्रशासनाला व गावकऱ्यांना जमाव हटविण्यात यश आले बारामती विभाग उपधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले यवत गावात जमावबंदी लागू करण्यात आली आहे सर्वांनी शांतता राखा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करा अन्यथा गैय केली जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या काही वेळातच आय जी सुनील फुलारी व पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिंल्ल यांचे आगमन झाले तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यवत येथे घडलेल्या घटनेचा आढावा घेतला यवत मध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा गावांमध्ये ठिक ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून शुक्रवारी रात्री पोलीसांनी धरपकड सुरू करुन अनेक युवा तरुणांना ताब्यात घेतले घेऊन दौंड न्यायालयात हजर केले आहे घडल्या प्रकरणी यवत गावातील ९३ तरुणांची नावे असुन ५०० ते ६०० अनोळखी तरुणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात असुन यवत ची बाजार पेठ शुक्रवार पासून कडकडीत बंद आहे गावात कोरोणा सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे गावातील चौका चौकात बाजार पेठेत मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त दिसून येत आहे.
वाचक क्रमांक :