By : Polticalface Team ,2025-08-22
दौंड (प्रतिनिधी ) दौंड तालुक्यातील गोपाळवाडी गावच्या सरपंच पदी स्वातीताई राजेंद्र पवार यांची प्रचंड बहुमताने निवड करण्यात आली माजी सरपंच रोहिणी ताई शिंदे यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली . गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय गोपाळवाडी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय गाडेकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी झुंबर होळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात आली, सरपंच पदासाठी स्वातीताई राजेंद्र पवार व विजया दिलीप सुळ यांचे अर्ज आल्याने गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले यावेळी स्वातीताई राजेंद्र पवार यांना 10 मते तर विजया दिलीप सुळे यांना पाच मते मिळाली यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय गाडेकर यांनी स्वातीताई राजेंद्र पवार यांची निवड झाल्याची घोषणा केली, नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार म्हणाले की गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली, यावेळी माजी प्रभारी सरपंच जयसिंग दरेकर, रोहिणी ताई शिंदे, वैशालीताई शिंदे , नीताताई गिरमे, मनीषा ताई होले, लक्ष्मीताई होले, उपसरपंच प्रकाश गिरमे, माजी उपसरपंच प्रवीण होले, शरद होले, रोहन गारुडी, सीमाताई बोरावके, सुरज भुजबळ, मनीषाताई भोसले तसेच यावेळी माजी चेअरमन शांताराम होले, विजय रंधवे, दादासाहेब पवार, सोन्या चव्हाण, सौरभ पवार, राजेंद्र पवार, अमोल चोरमले आधीसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई राजेंद्र पवार यांचा माजी सरपंच रोहिणी ताई शिंदे व निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय गाडेकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. किशोर टेकवडे यांनी केले
वाचक क्रमांक :