By : Polticalface Team ,10-08-2025
श्रीगोंदा प्रतिनिधी श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथे दिनांक 9 ऑगस्ट रोजी श्री उद्धव ढवळे यांच्या मातोश्री दुःखद निधनानंतर माजी मंत्री श्री बच्चू भाऊ कडू यांची सांत्वनासाठी भेट दिली व त्यानंतर येथे शेतकऱ्यांच्या मेळाव्यात आमदार बच्छू कडू यांनी सरकारवर तुफान हल्ला चढवला. "लाडकी बहीण योजना मतांसाठी काढतात, पण शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेल्या प्रश्नांवर सरकार गप्प बसते. निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करणार म्हणून डंका पिटणारे मुख्यमंत्री आज का बोलत नाही ?" असा थेट सवाल त्यांनी केला. कडूंनी हल्ला चढवत सांगितले — "सरकारकडे महसूल आहे, पण ग्रामीण भागासाठी पैसा नाही. सरकारी नोकरांना वेळेवर पगार मिळतो, मग शेतकऱ्यांना हमीभाव का मिळत नाही? शेतकऱ्यांचे पीक वाया जाऊ नये, हा सरकारचा धर्म आहे, पण हे सरकार तो धर्म पाळायला तयार नाही." धर्म-जातीय विभागणीवर त्यांनी थेट वार करत सांगितले — "राम मंदिराच्या नावाने लोकांना भडकवता, पण राम नावाचा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी येत नाही! धर्माच्या नावाखाली शेतकऱ्यांची फूट पाडून आमचा आवाज गप्प करण्याचा प्रयत्न थांबवा." हवामान बदल, उत्पादन खर्च वाढ, बाजारात दरघसरण यामुळे शेतकरी कर्जाच्या दलदलीत अडकले आहेत. आत्महत्यांचा आकडा वाढत चालला आहे. कडूंनी आव्हान दिले — "शेतकऱ्यांनो, आता एकत्र या! जाती-धर्म बाजूला ठेवा. शेतकरी उठला तर सरकार हादरलेच पाहिजे!" पोलिस यंत्रणेलाही त्यांनी इशारा दिला — "शेतकऱ्यांवर अन्यायकारक कारवाई झाली, तर लोकशाही मार्गाने पण लोखंडासारखी कठोर भूमिका घेतली जाईल. सरकारच्या दबावाखाली काम करणाऱ्यांनी सावध राहावे." कडूंनी शेवटी जाहीर केलं — "देशाला अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान आणि हक्क मिळवण्यासाठी आता रस्त्यावर उतरायलाच हवे. हे सरकार ऐकत नाही, आता त्यांना ऐकवावं लागेल!" यावेळी उखलगावचे विद्यमान सरपंच श्री बापूसाहेब ढवळे यांनी लाडकी बहिणीचे अर्ज बाद झालेत त्यांची तक्रार निवारण करण्यासाठी तालुका पातळीवर कक्ष स्थापन करण्यात यावा ही अपेक्षा व्यक्त केली व सर्व मान्यवरांचे आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. संजय लाकुडझोडे यांनी केले. यावेळी प्रहार जिल्हाध्यक्ष श्री विनोद परदेशी, प्रहार संघटनेचे पदाधिकारी, गंगाराम दरवडे, बाळासाहेब वाळके, बाबासाहेब दरवडे व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक