अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
By : Polticalface Team ,20-08-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
दौंड ता २०/०८/२०२५ दौंड शहरातील धक्कादायक घटना समोर आली आहे अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले आहे. दौंड शहरातील धक्कादायक घटनेची माहिती दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली या बाबत अधिक माहिती अशी की
दि.14/08/2025 रोजी रात्री 11/45 वाजण्याचे सुमारास मौजे दौंड ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत इंदीरा नगर येथील जब्बार शेख यांचे घरासमोर ही घटना घडली असून दौंड पोलीस स्टेशन येथे
फिर्यादी नितीन अशोक गुप्ते वय 41 वर्षे व्यवसाय भाजी विक्री रा.सरपंच वस्ती माने हॉस्पीटल जवळ दौंड ता.दौंड जि.पुणे याचे फिर्यादी वरून गु.रजि नं 520/2025 भा.न्या.संहिता कलम 103
अंन्वये सदर घटनेतील आरोपी विशाल उर्फ नण्या किसन थोरात रा.इंदीरा नगर दौंड जि.पुणे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे
हकिकत-
दि.14/08/2025 रोजी रात्री 11/45 वाजण्याचे सुमारास मौजे दौंड ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत इंदीरा नगर येथील जब्बार शेख यांचे घरासमोर इसम नामे विशाल उर्फ नण्या किसन थोरात याची आई जयश्री किसन थोरात हिचे प्रवीण दत्तात्रय पवार याचे सोबत असलेल्या अनैतीक संबंधाचे कारणा वरून राग मनात धरून चिडुन जावुन विशाल थोरात याने प्रविण पवार यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचे डोक्यात तोंडावर हातावर ठिक ठिकाणी कोयत्याने मारहाण करून त्यास जीवे ठार मारलेले आहे. म्हणुन माझी विशाल उर्फ नण्या किसन थोरात रा.इंदीरा नगर ता.दौंड जि.पुणे याचे विरूध्द फिर्याद आहे. दाखल अधिकारी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील
तपास पोलीस साहाय्यक इ.रूपेश कदम करीत आहेत
वाचक क्रमांक :