By : Polticalface Team ,23-06-2025
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
श्रीगोंदा प्रतिनिधी:-शफीक हवालदार
दि. 23 जून २०२५ रोजी श्रीगोंदा तालुक्यामधील नागरिकांना शासकिय योजनांची माहिती मिळावी, सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेता याव्यात व्यक्त होता यावे, तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबाबतच्या विषयावर व कार्यक्रमावर व त्या अनुषंगाने सर्वसाधारणपणे चर्चा व्हावी, या उद्देशाने तुळशीदास मंगल कार्यालय, श्रीगोंदा ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर येथे आमसभा २०२५आयोजित केली गेली. अध्यक्षस्थानी मा.आ.श्री. विक्रम बबनराव पाचपुते होते, तर मा. गटविकास अधिकारी राणीताई फराटे या सभेच्या सचिव म्हणून काम पहात होत्या.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना आमदारांनी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शाबासकी दिली तर काहींना चुका सुधारून चांगले काम करण्याचा सल्ला दिला. यावेळी पाचपुते यांनी आपले सर्वांचे आराध्य, प्रेरणास्थान “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” यांच्या नावाने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” २०२५ पासून दिला जाणार असल्याचे जाहिर केले. यामध्ये मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामधून दोन ग्रामपंचायत याप्रमाणे १६ ग्रामपंचायतीची निवड होणार असून १- प्रथम क्रमांक – ५५ लक्ष २- द्वितीय क्रमांक- २५ लक्ष ३- तृतीय क्रमांक- ११ लक्ष तर उर्वरित १३ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १ लक्ष असे एकूण १ कोटी ४ लक्ष रुपयांचे पारितोषिक दिले जाईल असे आमदार पाचपुते यांनी जाहिर केले. स्पर्धेचे अटी व नियम लवकरच जाहिर करण्यात येतील, स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीना मिळालेली रक्कम खर्च करण्याचा संपूर्ण अधिकार स्थानिक सरपंच व ग्रामसेवक यांना असेल. तरी मतदारसंघातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन बक्षीस मिळवावे असे आवाहन केले. यावेळी मा.तहसिलदार श्रीगोंदा, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीगोंदा नगरपालिका तसेच सर्व विभागाचे शासकिय अधिकारी, पदाधिकारी, राजकिय पदाधिकारी, कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक