दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
By : Polticalface Team ,24-06-2025
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी
दहिगाव उपसाचे आवर्तन गुरुवार दि २६ जून पासून सुरु होणार असून भीमा सीना बोगद्यातून आजपासून पाणी सोडले जाणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना आमदार पाटील म्हणाले की आजमितीस उजनी धरणात ७३ टक्के पाणी साठा असुन यात दररोज हजारो क्युसेसने वाढ होत आहे. पुर्वभागातील तसेच सीना माढा बोगद्याकाठच्या शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर आपण उजनी धरण लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर यांचेशी चर्चा केली व आवर्तन मागणी केली. यावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली असून आवर्तन देण्यासाठी नियोजनास तयारी सुरू केली करमाळा तालुक्यातील पुर्व भागात काही ठिकाणी पावसाचे प्रमाण मध्यम असल्याने या आव्रतनातून लाभक्षेत्रातील तलाव, बंधारे, नाला बिल्डींग, कोप बंधारे, शेततळी, ओढे आदि पाणी साठ्यात पाणी दिले जावे अशी सुचना आपण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. तसेच दहिगाव येथील पंप हाऊस एक व कुंभेज येथील पंप हाऊस दोन मधील सर्वच्या सर्ध दहा पंप हे पुर्ण क्षमतेने चालवून किमान १२० क्युसेस विसर्ग प्राप्त केल्यास मोठे तलाव भरण्यासाठी वेळ जाणार नाही यासाठी विशेष प्रयत्न करावेत असेही आपण सुचित केले आहे. मागील आवर्तनातील तांत्रीक अडचणी तात्काळ दुर करुन इथुन पुढील सर्व आवर्तने ही पुर्ण क्षमतेनेच दिली जावीत अशी सुचना आपण तांत्रीक व इलेक्ट्रिक विभागास दिली आहे. यामुळे या आवर्तनाचा जादा लाभ करमाळा तालुक्यातील वंचित गावांना दिला जाईल. तसेच वडशिवणे तलावात चारीच्याही अडचणी दुर करण्याचे आदेश आपण दिले आहेत. तरी सीना माढा बोगदा व दहिगाव उपसा सिंचन या दोन्ही माध्यमांतून करमाळा मतदार संघात लाभक्षेत्रातील गावांना नियोजनबद्ध पध्दतीने पाणी दिले जाईल असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.
जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.
श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके
लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट