यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

By : Polticalface Team ,30-06-2025

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ३० जून २०२५ दौंड तालुक्यातील मौजे सहजपुर ता दौंड जिल्हा पुणे सोलापूर महामार्गाने प्रवास करणाऱ्या इसमाचा अपघाती मृत्यू झाला असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली फिर्यादी तुकाराम भिकाजी कोडीतकर गाव पोलीस पाटील जावजी बुवाची वाडी रा.जावजी बुवाची वाडी, ता. दौंड जि.पुणे यांचे फिर्यादी वरून यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. कलम ५५४/२०२५ भा. न्याय. संहिता (बी.एन.एस) २०२३ चे क. १०६ (१) २८१, १२५ (अ),१२५ (ब) मो.वा. का. क. १८४,१३४/१७७ अंन्वये अज्ञात वाहना वरील अज्ञात चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हि घटना ता.२८/६/२०२५ रोजी सकाळी ०७ वाचे. सुमारास. मौजे सहजपुर ता. दौंड गांवचे हद्दीत होले वस्ती येथील अंकुश साहेबराव धाकतोडे यांचे घराचे समोर सोलापुर पुणे हायवे रोडवर घडली आहे परंतु अपघातातील मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही यवत पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी रिपोर्ट केला असुन अपघातात मृत्यू झालेल्या बेवारस मयताचा शोध होणे संदर्भात तपास मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सहजपुर हद्दीत होले वस्ती येथील अंकुश साहेबराव धाकतोडे यांचे घराचे समोर सोलापुर पुणे हायवे रोड या ठिकाणी झालेल्या अपघाताची किंवा मृत पावलेल्या बेवारस इसमाची ओळख किंवा माहिती असल्यास तत्काळ यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना माहिती देण्यात यावी असे आव्हान पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे गुन्हयाची हकीकत वर नमुद केले ता.वेळी व ठिकाणी एका अज्ञात वाहना वरील अज्ञात चालकाने त्याचे वाहन हे हयगईने, अविचाराने रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात सोलापुर बाजुकडुन पुणे बाजुकडे चालवित घेवुन जात असताना त्याचे वाहनाची रस्ता क्रॉस करीत असलेल्या एक अनोळखी इसम वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे नांव पत्ता माहीत नाही. यास जोरात धडक बसुन अपघात झाला या अपघातामध्ये एक अनोळखी इसमाला किरकोळ व गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असुन अज्ञात वाहना वरील अज्ञात चालक या अपघाताची खबर न देता निघुन गेला आहे. वगैरे मजुकरचे फिर्यादी वरून यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे ( मयताचे वर्णन खालील प्रमाणे बेवारस एक अनोळखी इसम वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे नांव पत्ता माहीत नाही. डोक्यास केस वाढलेले, चेहा उभट दाढी वाढलेली अंगाने मध्यम उंची १५६ सेंमी, रंग सावळा उजवे हाताचे मनगटावर पिवळे धातुचे कडे, तसेच करंगळी जवळील दोन बोटामध्ये पांढरे थातुच्या दोन अंगठ्या अंगावर काळे रंगाचा हाफ टी शर्ट निळे रंगाचा हाफ बरमुडा असे कपडे आहेत ) F11 तरी सदर गुन्हयाचे तपासकामी बेवारस मयताचा व अज्ञात वाहना वरील अज्ञात इसमाचा शोध सुरू आहे या बेवारस मृत्यू झालेल्या व्यक्तीची किंवा अपघाता बाबत कोणास अधिक माहिती असेल तर मयताचे नातेवाईक मिळुल आल्यास खालील नंबरला संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तपासी अंमलदार मारोती मेतलवाड पोलीस उपनिरीक्षक यवत पोलीस स्टेशन मो बा. नं. ९५०३४८७१११
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.