यवत येथील सिद्धिविनायक दुकानाला मध्यरात्री भीषण आग, सदगुरू वॉटर सप्लायर्स पाण्याच्या टँकरने आग आटोक्यात

By : Polticalface Team ,Tue Aug 30 2022 09:47:11 GMT+0530 (India Standard Time)

यवत येथील सिद्धिविनायक दुकानाला मध्यरात्री भीषण आग, सदगुरू वॉटर सप्लायर्स पाण्याच्या टँकरने आग आटोक्यात दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, सह प्रमोद शितोळे, दौंड ता,२९/०८/२०२२, यवत येथे पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या महेश दोरगे यांच्या सिद्धिविनायक ऑटोमोबाईल दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागल्याने. ग्रामस्थांची धावपळ अग्निशामक दलाची गाडी दुर असल्याने आग विझवण्यात नागरिक हतबल झाले होते, मात्र आग विझवण्यात नागरिकांच्या प्रेयत्नाला येश, सिद्धिविनायक दुकानात गुंतवणूक केलेल्या अंदाजे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे वर्तवले जात आहे, या वेळी दौंड नगरपालिका अग्निशमन दल व कुरंकुभ MIDC, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफिने आगीवर दोन तासानंतर नियंत्रण मिळवले, तोपर्यंत दुकानातील असलेले संपूर्ण मटेरियल जळून खाक झाले होते. अग्निशमन दलाची गाडी जवळपास असते तर एवढे मोठे नुकसान झाले नसते, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खंडू भाऊ दोरगे यांनी व्यक्त केली. याच प्रकारे मागील महिन्यात संदीप दोरगे यांच्या फर्निचरच्या कारखान्याला आग लागून करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच एक वर्षांपूर्वी हॉटेल कांचन व यवतमधील युवा उद्योजक अरिभाई तांबोळी यांच्या तेलाच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. अशा नैसर्गिक घटना वेळोवेळी घडत असल्याने यवत परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त करत यवत परिसरामध्ये अग्निशमन दलाची नितांत गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे, यवत भांडगाव परिसरातील वाढते औद्योगिकरण पाहता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन दल स्थापन करणे ही काळाची गरज असल्याची चर्चा गावात होत आहे, शेतकरी कुटुंबातील होतकरू व व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून मोठ्या मेहनतीने महेश दोरगे याने व्यावसायिक उद्योग उभा केला होता, मध्यरात्री आगीचा डोंब पाहुन ग्रामस्थ थंक झाले होते, काय करावे ते कळत नव्हते मात्र राहुल बनसोडे यांनी आपल्या सद्गुरु वॉटर सप्लायरचा पाण्याच्या टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न केला. या वेळी घटनास्थळी यवत पोलीस स्टेशनचे कर्मचारी, व यवत गावचे सरपंच समीर दोरगे. व माजी उपसरपंच विद्यमान सदस्य सदानंद दोरगे यांना माहिती मिळताच घटनास्थळी पोचले, यवत ग्रामस्थांनी व परिसरातील व्यावसायिक बांधवांनी आग विझवण्याचा प्रयत्न केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद