यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
By : Polticalface Team ,21-11-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता: २० नोव्हेंबर २०२४ दौंड विधानसभा भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल कुल व त्यांच्या कुटुंबातील मतदारांनी मौजे राहु ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
या प्रसंगी त्यांच्या पत्नी सौ. कांचन कुल व मातोश्री माजी आमदार श्रीमती रंजना कुल यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. या वेळी ते म्हणाले. मतदान करणे हा आपला संविधानिक हक्क आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क व कर्तव्ये बजावले पाहिजे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल कुल यांनी बोलताना सांगितले.
दौंड तालुक्यातील मागील महिना भरापासून विधानसभेच्या प्रचार रणधुमाळी सुरू होत्या. अखेर आज दि २० नोव्हेंबर रोजी सकाळ ७ वा. पासून विधानसभेचे मतदान सुरू झाले.
सकाळ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसुन येत होत्या. मात्र काही प्रभागा मधिल मतदारांना मतदार यादीतील नावाच्या शिल्पा मिळाल्या नाहीत. त्यामुळे बुथवर असलेल्या कार्यकर्त्यांनी मतदारांचे नाव यादीमध्ये शोधून शिल्पा देण्याची महत्वपूर्ण कामगिरी बजावली. दौंड तालुक्यात एकूण पाहता २ लाख ३० हजार ७६६ इतके मतदान झाले. असुन
पुरुष १ लाख १६ हजार ३८३. आहेत. तर. स्री १ लाख १४ हजार ३८४ व इतर २ अशी एकूण दौंड तालुक्यातील मतांची टक्केवारी- ७२.२६% मतदान झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रमेश थोरात या दोन उमेदवारांमध्ये दौंड विधानसभा मतदार संघात काटेकी टक्कर अशी लढत असल्याने ग्रामीण भागातील मतदान केंद्राच्या बाजूला मतदान यादी घेऊन कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. या ठिकाणी मतदारानी जाऊन मतदान यादीतील नाव प्रभाग क्रमांक खोली नंबर तपासून मतदानाचा हक्क बजावला. पुर्वी प्रभाग लोकसंख्या पाहता मतदान केंद्रातील प्रतेक बुथवर एका खोलीत दोन ईव्हीएम मशिनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मतदारांना मतदान करण्यासाठी केंद्रावर जास्त वेळ उभे राहावे लागत नसे. मात्र या विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रातील बुथ खोलीत एक ईव्हीएम मशिन ठेवण्यात आली होती त्यामुळे मतदार नागरिकांना दोन ते तीन तास ताटकळत उभे राहावे लागत असे. सकाळ पासून ते सायंकाळ पर्यंत मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने नागरीकांची गर्दी दिसून येत होती. मतदानाच्या वेळेत आतमध्ये आलेल्या मतदारांनी सायंकाळी उशिरा पर्यंत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. तर काही मतदारांना वेळेत मतदान केंद्रावर पोचता आले नाही. सायंकाळी ६ वाजता मतदान केंद्राचे प्रवेश द्वार बंद करण्यात आले होते. यवत पोलीस प्रशासन व एस आर पी जवान पोलीस अधिकारी दिवसभर प्रामुख्याने कर्तव्य बजावत होते. यवत परीसरातील सर्व मतदान केंद्रावर काही अपवाद वगळता सुरुळीत मतदान पार पडले.
दौंड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रीय पक्षाचे व अपक्ष असे एकूण १४ उमेदवारांचा समावेश असून प्रामुखाने भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश थोरात यांच्यात सरळ लढत होत असल्याचे स्पष्ट संकेत दिसून आले. या विधानसभा निवडणुकीत दौंडचा आमदार कोण ? याचा फैसला आज दि २० नोव्हेंबर रोजी मतदान पेटीत बंद झाला असुन दि २३ नोव्हेंबर रोजी अंतिम निर्णय लागणार असुन निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
वाचक क्रमांक :