By : Polticalface Team ,16-11-2024
दिनांक १६ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंद्यातील बाजारतळावर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते, ज्यांच्या आगमनाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी सुरेखा पुणेकर होत्या, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी केशव कातुरे यांनी उत्तमरित्या पार पाडली. व्यवस्थापनाची जबाबदारी समता सैनिक दलाने यशस्वीरित्या सांभाळली. गोरख आळेकर, बापू माने, अरुण जाधव, ऋषिकेश शेलार यांसारखे अनेक मान्यवर आणि मुस्लिम, ओबीसी, धनगर समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर होते.
सभेत ऋषिकेश शेलार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींवर भाष्य केले आणि तीन कारखानदारांविरुद्ध शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले. अरुण जाधव यांनी प्रस्थापित सत्तेवर जोरदार टीका करत, वंचितांचा स्वाभिमान कधीही विकला जाणार नाही, असे ठामपणे सांगितले.
अण्णासाहेब शेलार यांनी आपले भाषण दृढ आणि ठामपणे केले. त्यांनी सांगितले की, “तीन साखर सम्राटांविरुद्ध निवडणूक लढवण्याचा निर्धार मी केला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी प्रामाणिक राहून मी पाच खोक्यांचा सौदा नाकारला आहे.”
प्रकाश आंबेडकर यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका करत शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यांनी विक्रम पाचपुते यांच्यावर टीका करत, “जो उमेदवार आईचा नाही, तो जनतेचा कसा असेल?” असा सवाल उपस्थित केला.
शेवटी, मुस्लिम बांधवांना उद्देशून, आंबेडकर यांनी महंमद पैगंबरांबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. सभेला उपस्थित प्रत्येक घटकाने शेलार यांना पाठिंबा देण्याचे वचन दिले आणि वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळाल्याचे स्पष्ट झाले.
वाचक क्रमांक :