By : Polticalface Team ,27-01-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी ) :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझ्या देशासाठी युवक डिजिटल साक्षरतेसाठी युवक या उपक्रमांतर्गत मढेवडगाव येथे श्रम संस्कार शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरातील पाचवे पुष्प गुंफण्यासाठी व्याख्याते म्हणून प्रख्यात नाटककार सुरेंद्र गुजराती हे आले होते त्यांनी विविध कविता आणि कथा सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. जीवन रडत रडत जगण्या पेक्षा आनंदाने कसे जगावे यावर विविध कविता सादर केल्या.
या व्याख्यानमालेसाठी अध्यक्ष म्हणून श्री. कल्याण शिंदे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नागवडे कारखान्याचे संचालक रमजान हवालदार यांनी विद्यार्थ्यांना जीवन कष्ट कसे महत्वाचे असतात याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ.मनोहर सूर्यवंशी, प्रा.मिलिंद बेडसे, डॉ.योगेश अहिरे, प्रा. किरण नागवडे, प्रा. संदीप लाढाणे, प्रा. प्रवीण नागवडे, डॉ. प्रमोद परदेशी, प्रा.विलास सुद्रिक, प्रा. सुरेखा शेळके, प्रा. ज्योती थिटे, डॉ.सखाराम पारखे, प्रा.सागर रोडे, प्रा.दिपाली गायकवाड, प्रा.राजेश्री भागवत,प्रा. सुरज दिवेकर,श्री.बाबा शिंदे व श्री दिलीप मोहारे यांनी प्रयत्न केले.
वाचक क्रमांक :