दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
By : Polticalface Team ,11-11-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ११ नोव्हेंबर २०२४. दौंड तालुक्याच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार राहुल कुल हे एक व्हिजन असलेला नेता असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी यापुढे राहुल कुल यांच्याबरोबर ठामपणे उभा राहणार असून त्यांच्या विजयाची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेत आहे अशी माहिती भीमा पाट्स चे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी दिली आहे.
या वेळी बोलताना थोरात पुढे म्हणाले की स्वर्गीय आमदार काकासाहेब थोरात आणि स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी या विधानसभेत महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांचा विक्रमी मतांनी विजय नोंदवणे गरजेचे आहे. म्हणून मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह राहुल कुल यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.
वाचक क्रमांक :