लिंपणगाव प्रतिनिधी: गेली चाळीस वर्षे श्रीगोंदा तालुक्याने बबनराव पाचपुते यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. त्यातून ते मंत्री, पालकमंत्री झाले. पण त्यांच्याकडून स्वांताच्या गावचा विकास त्यांना करता आला नाही तर त्यांचा मुलगा काय दिवे लावणार त्यामुळे परिवर्तन अटळ आहे. आमदाराचा मुलगा आमदार आम्ही करणार नाही. तर या विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील संपूर्ण धनगर समाज हा महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधाताई नागवडे यांच्या सोबत राहून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार असल्याची ग्वाही काष्टी येथील स्वामी समर्थ संस्थेचे संस्थापक व नागवडे कारखान्याचे माजी संचालक आबासाहेब कोल्हटकर यांनी बोलताना सांगितले.
श्रीगोंदा तालुक्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी चालू असताना महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ धनगर समाजाचे पदाधिकारी गावोगावी फिरुण नागवडे यांच्या मशालीचा घर टु घर प्रचार करित आहेत.
यावेळी बोलताना कोल्हटकर म्हणाले आम्ही अनेक वर्षे आमदार पाचपुते यांच्या सोबत राहिलो परंतु त्यांच्याकडे विकासाची दुरदृष्टी नाही. अनेक वर्षे त्यांच्या कडे महत्वाचे मंत्रीपदे होती.पालकमंत्री होते.पण तरुणांना रोजगार देता आला नाही. तालुक्यात फिरताना सामान्य जनतेला त्यांनी फक्त विकासाची आश्वासने दिली.परंतु विकास मात्र कागदावर राहिला. समाजाची प्रश्न कधी समजुन गेले नाही. सोडविले नाही.स्वांताच्या गावात आम्हाला वाडीवस्तीवर रस्ते, पाणी,लाईटची सोय नाही. प्रत्येक निवडणूक आली फक्त आश्वासन द्यायचे खोटे बोलाचे एवढच काम त्यांनी केले.आणि आता मुलगा विक्रमला उमेदवारी दिली. साडे चार वर्षे तो कधी मतदार संघात नसतो. निवडणूक जवळ आली कि सक्रिय होतो. पण अशा ढोगी लबाडांना जनता आता थारा देणार नाही.गावच्या ग्रामपंचायत निवडणूकीत आमदार पुत्र प्रतापसिंह चा पराभव करुण परिवर्तनाची सुरुवात केली आहे. आता तालुक्यात अनुराधा नागवडे यांच्या परिवर्तन घडवायचे आहे. म्हणून आम्ही सर्व धनगर समाज बांधव एकत्र येवून नागवडे यांच्या प्रचासाठी फिरत आहे.असे कोल्हटकर म्हणाले.यावेळी तालुक्यातील धनगर समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते.
वाचक क्रमांक :