सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

By : Polticalface Team ,14-11-2024

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

    लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंद्याच्यालोकप्रतिनिधींनी गेले 35 ते 40 वर्ष श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला विविध आमिषे दाखवत सत्ता हस्तगत केली; परंतु श्रीगोंदा तालुक्याची अधोगतीच राहिली. श्रीगोंदा च सर्वांगीण विकास साधण्यासाठी आता गाफील न राहता महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांना निवडून द्या तालुक्याच्या विकासाची हमी आम्ही घेतो. असे आवाहन शिवसेनाप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीगोंदा येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना व्यक्त केले. 

     नगर श्रीगोंदा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदा येथे शेख महंमद महाराजांच्या प्रांगणामध्ये शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

      यावेळी उपस्थितीत मतदारांसमोर बोलताना पक्षप्रमुख श्री ठाकरे पुढे म्हणाले की; श्रीगोंदा तालुक्याचा विकास साधताना सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी खऱ्या अर्थाने आपले भरीव योगदान देऊन सर्वांगीण विकास साधला ;परंतु ज्यांना चाळीस वर्ष तालुक्यातील जनतेने आमदार केले. त्यांनी मात्र तालुक्याचे वाळवंट केले. आता सहकार महर्षी बापूंचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधा नागवडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विधानसभेत पाठवा. निश्चितपणे विकास काय असतो तो आम्ही दाखवून देऊ; असे सांगून श्री ठाकरे आणखी पढे म्हणाले की; महाविकास आघाडी कडून आम्ही साजन पाचपुते यांच्यासाठी मतदार संघ निवडला परंतु साजन पाचपुतेनी मनाचा मोठेपणा दाखवून अनुराधाताईंना नागवडेंना आघाडी कडून उमेदवारी द्या; वास्तविक पाहता नागवडे कुटुंबाचा श्रीगोंदा तालुक्याच्या विकासात मोठा त्याग आहे. मागील 2019 ला साजनचे वडील सदाशिव अण्णा पाचपुते यांनी नागवडे कुटुंबांना 2024 ला आम्ही तुम्हाला मदत करू तो शब्द साजन पासून त्यांनी पाळला. असे सांगून श्री ठाकरे यांनी भाजप सरकारवर सरकून टीका करताना म्हटले आहे की; मोदी शहा यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलावे. आमच्यावर टीका करताना भान ठेवावे. याउलट महाराष्ट्रातील अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारचे फोडाफोडीचे राजकारण करून गद्दारांना व भ्रष्टाचारी वृत्तींना सत्तेवर बसवले. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या घोषणा सुरू केल्या. परंतु राज्यातील जनता सुज्ञ आहे. कदापिही या घोषणांना बळी पडणार नाही. आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी जात असताना आमच्या बॅगा  निवडणूक यंत्रणेकडून तपासल्या जातात. मग पंतप्रधान राज्यात प्रचारासाठी जात असताना त्यांच्या का बॅगा तपासल्या जात नाही. असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान हे स्वार्थासाठी मिरवतात. तर राज्यातील भाजपच नेते हे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊ नये म्हणून बंडखोरांना पाठबळ देतात. परंतु जनतेने देखील या भाजपावाल्यांचे कारनामे ओळखले आहेत. ठाकरे आणखी पुढे म्हणाले की; भाजपचे नेते राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठी ईडीचा धाक दाखवतात. आणि पक्षात आल्यानंतर कारखानदारांची पाठराखण करतात. असे सांगून श्री ठाकरे आणखी पुढे म्हणाले की; साठ वर्षात नागवडे कारखान्याचा कारभार तपासा आणि विरोधकांचे पंधरा वर्षातील कारखान्यांची अवस्था पहा. नागवडेंनी सहकार चळवळ मोठ्या संघर्षातून उभी करून कष्टकरी शेतकरी यांना न्याय देण्याची सतत भूमिका घेतली. म्हणूनच या कारखान्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. शेतकरी ऊस उत्पादकांचा देखील नागवडेंवर विश्वास आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर पाच वर्षे जीवनावस्थेत वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार आहोत. श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न डिंबे; माणिक डोह साखळीई योजनेचे काम प्रथम खाती घेणार आहोत. असे आश्वासन देत श्री ठाकरे आणखी पुढे म्हणाले की; मागील अडीच वर्षांपूर्वी आम्ही सत्तेवर होतो. तेव्हा दोन लाखापर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ केले. आता पुन्हा 2024 ला सत्तेवर येताच शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंतची कर्ज माफ करणार आहोत तर लाडक्या बहिणींसाठी प्रति महिना तीन हजार रुपये देऊ यासह महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याची पूर्तता करणार आहोत. भाजपवर टीकास्त्र सोडताना श्री ठाकरे पुढे म्हणाले की; अडीच वर्षाच्या कालावधीत भाजप सरकारने राज्यातील उद्योगधंदे गुजरातला घेऊन गेले. दुसरीकडे मात्र महाराष्ट्राच्या विकासाचा कळवा आणायचा ही वृत्ती आता सर्वांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत गाडून टाकायची आहे. विकासाच्या गॅरंटीचा महाराष्ट्र हे फक्त महाविकास आघाडीचे सरकारच करू शकते. असे सांगून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रचंड मतांनी निवडून द्यावे; असे आवाहन श्री ठाकरे यांनी यावेळी केले. 


     याप्रसंगी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांना जाहीर पाठिंबा दिला. 


       याप्रसंगी मराठा मुस्लिम समाजाचे संस्थापक शेख सुभान अल्ली; सुनंदाताई पाचपुते; काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार; फौजीया खान महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे आदींची भाजप विरोधी सरकार लोकप्रतिनिधी व अपक्षांवर कडाडून अशी भाषणे झाली. 


      अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी बोलताना सांगितले की; सहकार महर्षी व श्रीगोंद्याचे भाग्यविधाते शिवाजीराव नागवडे बापू हेच खरे तालुक्याचे कणखर व विकासाभिमुख नेतृत्व होते. सर्वसामान्यांचा सतत ध्यास घेणारे हे नागवडे कुटुंब अत्यंत प्रामाणिकपणे तालुक्याचे प्रश्न मार्गी लावतात सहकार महर्षी बापूंचा वारसा नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे; महाविकास आघाडीचे उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे; दीपक शेठ नागवडे हे कणखरपणे चालवत आहेत. सौ नागवडे या शिवसेनेच्या उमेदवार असल्या तरी महाविकास आघाडीचा धर्म सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. श्रीगोंदा तालुक्यात ज्यांना चाळीस वर्षे आमदार केले. त्यांनी मात्र तालुक्याच्या विकासात लक्ष दिले नाही. स्वतःची प्रगती साधली तालुक्यातील अनेक प्रलंबित रस्ते; विज; पाणी या प्रश्नासाठी प्रत्येक वेळी तालुक्यातील जनतेला आंदोलन करावे लागते. मग हा विकास साधला कुठे ?याचे उत्तर मात्र लोकप्रतिनिधींनी द्यायला हवे. काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांची भूमिका देखील महत्त्वाचे आहे. तालुक्याच्या प्रश्नावर सतत संघर्ष करतात सौ अनुराधाताई नागवडे यांना निवडून आणण्यासाठी ते सक्रिय होऊन प्रयत्नांची पराकष्टा करणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेने कुठलीही शंका घेण्याची गरज नाही. निश्चितपणे महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधा नागवडे या सर्वांच्या पाठबळावर प्रचंड मतांनी निवडून येतील अशी ग्वाही देखील माजी मंत्री थोरात यांनी यावेळी बोलताना दिली. 

        या सभेस खासदार फौजिया खान; मराठा मुस्लिम समाजाचे संस्थापक शेख सुभान अली; ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस; काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार; ओबीसी सेलचे राजा गावकर; जिल्हा शिवसेनाप्रमुख शशिकांत गाडे; शिवसेना उपप्रमुख साजन भैय्या पाचपुते; नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे; बाळासाहेब सुतारे सुनंदाताई पाचपुते; प्रशांत दरेकर; विजय शेंडे; संपतराव म्हस्के; बाबासाहेब गुंजाळ; माजी नगराध्यक्ष सुनीता शिंदे; संगीता मखरे; डीडी घोरपडे आदींसह नगर श्रीगोंदा मतदारसंघाती व तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते; पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

     प्रस्ताविक ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी केले. आभार शिवसेनेचे उपनेते साजन भैय्या पाचपुते यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद

हेमंत नलगे यांच्या नागवडेंसोबत जाण्याचा निर्णय; राहुल जगताप यांना धक्का

येळपणे गावातून अनुराधाताई नागवडेंना भरघोस मताधिक्य मिळवून देऊ ग्रामस्थ व महिलांचा निर्धार

अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांचे काही ठिकाणचे बॅनर फाडले!

ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडविले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही , नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे

माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत - घनश्याम शेलार

अखेर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नादुरुस्त रस्त्याचा तिढा सुटला !, चर काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिक्रमण रस्ता दुरुस्तीला अडथळा

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले काम काय करणार? नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला निर्णय

महापुरुषांचे उत्कृष्ट प्रकारे गीत गायन रेकॉर्डिंग कार्यक्रम मध्ये साने संगीत जनजागृती लोककला मंचला संधी.

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर दौंड तालुक्यात निषेध व्यक्त. यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे दिले निवेदन.