By : Polticalface Team ,Sat Sep 10 2022 21:15:07 GMT+0530 (India Standard Time)
सविस्तर माहीतीस्तव:- बीड -अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ या १४०.७७५ कि.मी. लांबी असलेल्या एकूण १०५० कोटी रूपये किंमतीच्या रस्ते कामास मंजुरी मिळणार असून कामास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती दि.१७ जुलै २०२१ रोजी आ.सुरेश आण्णा धस यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती ,यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी यांची आ.सुरेश धस यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन बीड ते अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी दर्जाच्या कामास मंजुरी मिळावी तसेच या संपूर्ण रस्त्यावरील अपघातस्थळ असलेल्या जागी रुंदीकरण तसेच प्रमुख गावाजवळ सर्व्हिस रोड करणेबाबत सकारात्मक चर्चा होऊन नितिनजी गडकरी यांनी लवकरच कामास मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे आ.सुरेश धस यांनी म्हटले होते. या घटनेला वर्ष होऊन गेले परंतु रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नाही.
मात्र सध्या रस्त्याची दुरावस्था असुन आष्टी तालुक्यातील मौजे.चिंचपुर गावाजवळील "गौरी रेस्टॉरंट "समोरील राष्ट्रीय महामार्गावरील मोठमोठाले खड्डे व पावसाळ्यात त्याठिकाणी साचलेले पाणी पाहता त्याठिकाणी मत्स्य पालन केंद्र उभारण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे. डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर मो.नं.८१८०९२७५७२ वाचक क्रमांक :