आष्टीच्या फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षक दिन संपन्न

By : Polticalface Team ,Sun Sep 11 2022 20:35:17 GMT+0530 (India Standard Time)

आष्टीच्या फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षक दिन संपन्न आष्टी प्रतिनिधी आनंद चॅरीटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसी आष्टी (डी फार्मसी )व कॉलेज ऑफ फार्मासूटिकल सायन्स अँड रिसर्च आष्टी (बी. फार्मसी) या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. मा. आ .भीमरावजी धोंडे साहेब यांनी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे थोर विचारवंत समाज सुधारक, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे महात्मा ज्योतिराव फुले व पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. संस्थापक अध्यक्ष मा. आ. भीमराव धोंडे साहेब मनोगत व्यक्त करताना म्हणाले की जीवनात आपल्याला यशस्वी होण्यासाठी शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो.शिक्षक हा विद्यार्थ्यांना मार्ग दाखवतो . शिक्षकांचा आदर केला पाहिजे ते सांगेल त्या पद्धतीने मार्ग अवलंबले पाहिजेत तरच जीवनामध्ये यश मिळते .या कार्यक्रमानिमित्त बी फार्मसी कॉलेजचे 12 विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरची प्रवेश प्रक्रिया(जी पॅट) उत्तीर्ण झालेली व त्यामधून 2 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय औषध व संशोधन शिक्षण संस्था ( नायपर) यामध्ये कुमारी कर्डिले पुनम काशिनाथ व कुमारी कोल्हे अश्विनी जयवंत यांची निवड झाली,प्रवेश मिळाला या उत्तीर्ण व प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. भीमरावजी धोंडे साहेब यांनी अभिनंदन केले. पुढे भाषणात म्हणाले की फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी असे संशोधन करावे की जे सर्वसामान्य व्यक्तींसाठी उपयोगी पडेल कॅन्सर सारख्या आजारावर नवीन औषध शोधून काढावे. वेगवेगळ्या आजारावर मात करता येईल असे औषधाचे संशोधन करावे अशी आशा व्यक्त केली. या कार्यक्रमाला संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. डी बी राऊत सर, कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील कोल्हे सर तसेच सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते . शिक्षक दिनानिमित्त शिक्षक होऊन बी फार्मसी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी द्वितीय, तृतीय तसेच डी .फार्मसी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या फार्मसी विषयाचे मार्गदर्शन केले. या शिक्षक दिनानिमित्त वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक झाल्याचे स्वतःचे अनुभव सांगितले , शिक्षकावर कविता,गीत असे विविध कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमांमध्ये सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांनी पुषपगुच्छ श्रीफळ व सुंदर असे गिफ्ट देऊन आशीर्वाद घेतले.या कार्यक्रमाचे नियोजन संस्कृती कार्यक्रम प्रमुख श्री प्रीतम धोंडे सर, श्री मोरे सर श्रीमती बनकर मॅडम, म्हस्के मॅडम यांनी केले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री कोपनर ए बी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद