लडकतवाडी ग्रामपंचायत येथे बंदिस्त ड्रेनिज लाईनचे मान्यवर नागरिकांनी केले भूमिपूजन

By : Polticalface Team ,Tue Sep 13 2022 17:27:06 GMT+0530 (India Standard Time)

लडकतवाडी ग्रामपंचायत येथे बंदिस्त ड्रेनिज लाईनचे मान्यवर नागरिकांनी केले भूमिपूजन दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड तालुक्यातील मौजे लडकतवाडी ग्रामपंचायत येथे दि.१२/०९/२०२२ रोजी ग्रामपंचायत विकास कामांच्या माध्यमातून आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याने २५/१५ निधीतून तब्बल १० लाखाचे सार्वजनिक बंदिस्त ड्रेनेज लाईनचे भूमिपूजन स्थानिक मान्यवर व उपसरपंच यांच्या उपस्थितीत करण्यात आले, या वेळी ग्रामपंचायत उपसरपंच आणि गावातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, लडकत वाडी ग्रामपंचायत सार्वजनिक विकास कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही,असे आमदार राहुल कुल यांनी यापूर्वीच सांगितले असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती, या पार्श्वभूमीवर लडकतवाडी ग्रामपंचायत उपसरपंच व काही सदस्य यांनी गाव विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या प्रलंबित असलेल्या विविध विकास कामा संदर्भात १) उत्कृष्ट ग्रामपंचायत कार्यालय, २) गावामध्ये सार्वजनिक फिल्टर पिण्याचे पाणी पुरवठा, ३) सार्वजनिक बहूउद्देशीय सभागृह, ४) सार्वजनिक व्यायाम शाळा, ५) अंगणवाडी, ६) गावातील विविध ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ता, ७) ड्रेनेज लाईन, ८) सार्वजनिक सभा मंडळ, ९) गावात विविध ठिकाणी हायमॅक्स १०) स्टेट लाईट दिवे, ११) जमीन गट नं, १०३३ मधिल गटातील जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेली जमीनी पैकी दोन एकर जमीन मिळण्याबाबत काही महत्त्वपूर्ण गाव विकास कामे प्रलंबित आहेत, ते मार्गी लागावी या उद्देशाने, दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल यांच्याकडे साखडे घालण्यात आले असल्याचे उपसरपंच रविंद्र होले यांनी सांगितले, लडकतवाडी ग्रामपंचायत गाव विकास कामासाठी योग्य निधी उपलब्ध करून देण्यात येईल,असे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी दिले असल्याचे ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच रवींद्र होले यांनी सांगितले, या प्रसंगी गावातील विद्यमान सरपंच व सदस्य, या कार्यक्रमाला गैरहजर असलेल्याने ग्रामसेवक यांना दूरध्वनी वरून विचारणा केली असता, सदर कार्यक्रमाची कोणतीही माहिती मिळाली नाही,असे ग्रामसेवक यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले, तसेच विद्यमान सरपंच सौ रागिनी गणेश जगताप यांनाही खंत व्यक्त करत, कोणतीही माहिती न देता मंजुर असलेल्या वार्ड क्र,३ मधील बंदिस्त ड्रेनिज लाईनचे भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला, उद्घाटन त्यांनी केले काय किंवा मी केले काय,? हा विषय गौण आहे, मात्र काम होतंय हे महत्त्वाची व चांगली बाब आहे, मला या बाबत माहिती दिली असती तर मी देखील उपस्थित राहू शकले असते, अशी प्रतिक्रिया विद्यमान सरपंच सौ,रागिनी जगताप यांनी व्यक्त केली आहे, तसेच जिल्हा अधिकारी यांच्या नावे असलेली जमीन गट नंबर 1033 मध्ये ग्रामीण रुग्णालय उपकेंद्र झाल्यास गावाच्या विकासात भर पडणार आहे, या संदर्भात गतीने प्रयत्न व कार्यवाही पूर्ण केली जात आहे. येत्या काही महिन्यात या जागेत सरकारी ग्रामीण रुग्णालय उपकेंद्र उभारण्यात येणार असून बांधकाम करण्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद आवश्यक असल्याचे ग्रामपंचायत उपसरपंच रविंद्र होले व माजी उपसरपंच अतुल होले यांनी सांगितले. या आधी रुग्णालयासाठी ८५ लाख रुपय निधी मंजूर झाला होता, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे निधी परत वर्ग करण्यात आला, असल्याची चर्चा गावात होत आहे, लडकतवाडी ग्रामपंचायत गाव विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका घेऊन, पुढील काळात योग्य दिशेने वाटचाल करुन काम करणार असल्याचे भुलेश्वर शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन अँड, प्रा,शांताराम टिळेकर सर व दत्तात्रय वाघमोडे यांनी सांगितले. या प्रसंगी भीमा पाटस सह, कारखान्याचे माजी संचालक कैलास बधे,शिवाजी लडकत,भुलेश्वर शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन दत्तात्रय वाघमोडे, सुदाम होले, भगवान लडकत, ग्रा.पं.उपसरपंच रविंद्र होले, ग्रा.पं.सदस्य अतुल होले, ग्रा.पं.सदस्य दत्तात्रय लडकत, ग्रा.पं.सदस्या मंडुबाई लडकत,ग्रा.पं.सदस्या उज्ज्वला वाघमोडे, दौंड एस टी आगाराचे कामगार अध्यक्ष राजेंद्र लडकत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोपट होले, माजी पोलीस कर्मचारी बाळासाहेब लडकत,जनार्दन लडकत, सुरेश लडकत, गोपाळ होले, नानासाहेब गिरमे, रविंद्र होले, गोरख होले,अनिल होले, राजाराम लडकत, शशिकांत लडकत, तुषार होले, प्रजित होले, सुनिल थोरात, अनिकेत लडकत, महेश लडकत, विकास लडकत, पांडुरंग लडकत, बबन लडकत, चेतन नवले, सागर लडकत, नरेश बोरावके, छबन नातू, यासंह अनेक लडकतवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद