१ लाख ९२७८० अपहार २९९८८ दाखवून ग्रामरोजगार सेवकाचा बळी सीईओ अजित पवार यांचा महाप्रताप :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
By : Polticalface Team ,Thu Sep 15 2022 12:48:17 GMT+0530 (India Standard Time)
गेवराई : तालुक्यातील मौजे. शेकटा ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत कामात मजुर म्हणून चक्क मयत,शासकीय कर्मचारी,बाल कामगार दाखवून निधी उचलण्यात आला होता संबधित प्रकरणात वर्षभरापासुन चौकशीच्या नावाखाली भ्रष्टाचार प्रकरणातील वरिष्ठांना वाचवण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार तसेच उपमुख्य कार्यकारी आधिकारी (पंचायत)जिल्हापरिषद बीड प्रदीप काकडे यांच्याकडुन करण्यात येत होता. संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना लेखी तक्रार केली होती.
त्रिसदस्यीय समितीत दोषी गटविकास आधिकारी,सहाय्यक लेखाधिकारी तसेच ग्रामसेवक,ग्रामरोजगार सेवक,ऑपरेटर आणि कारवाई फक्त ग्रामरोजगार सेवकांवर
त्रिसदस्यीय समितीत अपहाराची रक्कम १ लाख ९२ हजार मात्र वसुलीचे आदेश फक्त २९ ,९८८ रूपये
सदर प्रकरणात पुन्हा चौकशीची मागणी केल्यानंतर त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली यात चौकशी समिती प्रमुख दिपक जोगदंड,सहाय्यक लेखाधिकारी समिती सदस्य आरूण बुरांडे,सकाअ नरेगा कक्ष समिती सदस्य श्रीमती स्वाती कुटे यांनी सादर केलेल्या अहवालात एकुण अपहार १ लाख ९२ ७८० रूपये दाखवून अपहारास जबाबदार तत्कालीन गटविकास आधिकारी अनिरूद्ध सानप,सहाय्यक लेखाधिकारी श्री.बी. आर. कुलकर्णी,ग्रामसेवक वाघमारे एस.एस. आणि ग्रामरोजगार सेवक रामदास शेंबडे व ऑपरेटर देशपांडे यांना दोषी धरण्यात आले होते.मात्र आधिका-यांना वाचवण्यासाठी १ लाख ९२,७८० रू.चा अपहार २९ हजार ९८८ रूपयापर्यंत आणुन ग्रामरोजगार सेवक रामदास शेंबडे यांचे सेवासमाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
सीईओ अजित पवार यांनी कारवाईस जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई :-डाॅ.गणेश ढवळे
शेकटा ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगा अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा सीईओ अजित पवार जाणीवपुर्वक कारवाईस टाळाटाळ करत होते अखेर विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना अजित पवार यांची तक्रार केल्यानंतर अजित पवार यांनी सुनावणी घेतली परंतु तेव्हा सुद्धा कारवाई करण्यास जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला विभागीय आयुक्ताकडुन मार्गदर्शन या नावाखाली विलंब केला अखेर ग्रामरोजगार सेवकाचाच बळी देऊन ईतरांची पाठराखण केली.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद