जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात जिल्हापरिषद आधिकारी व कंत्राटदारांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पितृदोष निवारणआंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

By : Polticalface Team ,

जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात जिल्हापरिषद आधिकारी व कंत्राटदारांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पितृदोष निवारणआंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर बीड जिल्ह्य़ातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामात मोठ्याप्रमाणात अनियमितता व सल्लागार यांनाच कंत्राटे देणे तसेच मर्जीतील गुत्तेदारांनाच नियमबाह्य टेंडर वाटप करणे आदि. प्रकारे गैरव्यवहार झाला असून जिल्हापरिषद प्रशासनातील वरिष्ठ आधिकारी यांनी कंत्राटदारांशी संगनमतानेच शासनाची दिशाभूल करून गैरव्यवहार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल निलंबित करण्यात येऊन नव्याने टेंडर प्रकीया करण्यात यावी या मागणीसाठी आज दि.१९ सप्टेंबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आधिकारी आणि कंत्राटदाराच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पितृदोष निवारण"आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन बीड तालुकाध्यक्ष शेख युनुस च-हाटकर,रामनाथ खोड, के.के. वडमारे,बबन माने,संभाजी सुर्वे,शेख मुस्ताक,धनंजय सानप आदि सहभागी झाले होते. निवेदन नायब तहसीलदार टी.एस.आर्सुळ यांना देण्यात आले.

वरिष्ठ जिल्हापरिषद आधिका-यांवर निलंबनाची कारवाई करा; नव्याने नियमांचे पालन करून टेंडर वाटप प्रक्रिया करून (S.I.T.)मार्फत चौकशी करा जलजीवन मिशन योजनेंतर्गत जवळपास ३०० कोटी रुपयांच्या कामाचे वाटप झाले असून जलजीवन मिशन अंतर्गत सर्व्हेक्षण,अंदाजपत्रके व आराखडे तयार करणा-या अभियांत्रिकी सल्लागारांनीच स्वतःच्या तसेच नातेवाईकांच्या नावे कंत्राटे भरली आहेत त्यामुळेच त्यात गैरव्यवहार होण्याची दाट शक्यता असुन नियमबाह्य पणे कामे देणे चुकीचेच आहे. तसेच नियम डावलुन जिल्हापरिषद ग्रामिण पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी तसेच टेंडर क्लार्क यांनी त्यांच्या नातेवाईकांना कोट्यावधीची कामे वाटप केली असून संबधित प्रकरणात मोठ्याप्रमाणात आर्थिक उलाढाल झाली असून संबधित प्रकरणात जबाबदार मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार,प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड प्रदिप काकडे,कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हापरिषद बीड दादाराव डाकोरे, कक्षप्रमुख नामदेव उबाळे,सहाय्यक लेखाधिकारी बाळासाहेब वीर तसेच टेंडर प्रमुख शिवाजी चव्हाण यांना तात्काळ निलंबित करण्यात येऊन सध्याचे कामांचे टेंडर रद्द करून नव्याने नियम व अटींचे पालन करून टेंडर प्रक्रीया पुर्ण करावी आणि अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटी (S.I.T.) मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत नरेंद्रजी मोदी, राज्यपाल, मुख्यमंत्री,प्रधान सचिव, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री,ग्रामविकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर मो.नं.८१८०९२७५७२

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद